Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

हिसवळ खुर्द येथे रक्तदान शिबिर संपन्न!

Oct 29, 2021

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे संचालक दिलीप पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हिसवळ खुर्द येथे हिसवळ ग्रामस्थांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार संजय पवार, मनमाडचे माजी नगराध्यक्ष योगेश पाटील, अशोक पवार, विठ्ठल आहेर, अशोक निकम, एसआय पटेल (प्राचार्य नांदगाव), उपप्राचार्य मराठे सर, न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव चे मुख्याध्यापक गोटे सर,तांदळे सर, मांडवड येथील मुख्याध्यापक खैरे सर, श्रीमती मोरे मॅडम आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुरुवातीला दिपप्रज्वलन करण्यात आले. तसेच छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन येथील स्थानिक सभासद दामोदर आहेर व सौ सुधाताई आहेर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय आहेर यांनी केले तर सूत्रसंचालन दत्तात्रेय भिलोरे यांनी केले. याप्रसंगी कवडे सर, माजी आमदार संजय पवार यांनी मनोगत व्यक्त केले. उपस्थित मान्यवरांचा हिसवळ ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

डॉक्टर वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय, नाशिक यांचे अधिकारी डॉ. मयुरी कुटे, डॉ. गायत्री अवताडे, डॉ. आनंदी भानुषाली, डॉ. शुभम वराडे, मनिष सराफ, गजानन पावरा, गणेश मोरे, अंकिता सावकार आदी आरोग्य कर्मचारी उपस्थित होते तर येथील चेअरमन डॉ. पुंजाराम आहेर, सरपंच कैलास फुलमाळी, ग्रामपंचायत सदस्य नानासाहेब आहेर, बंडूकाका आहेर, गोविंद आहेर, लखन आहेर, संदीप कदम, संदीप आहेर, शांताराम लोखंडे, ग्रामसेवक ईश्वर गायकवाड, विठ्ठल दादा आहेर, प्रकाश बाबा काळे, मोहनदादा आहेर, राजेंद्र आहेर, किशोर आहेर, गणपत आन्ना आहेर, आप्पासाहेब आहेर, रामचंद्र आहेर, शुभम आहेर, निळकंठ आहेर, विलास आहेर, नवनाथ आहेर, मंगेश आहेर, आदीसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव शहरातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नारधमावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल

नांदगाव शहरातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नारधमावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल

नांदगाव : प्रतिनिधी येथील अल्पवयीन पीडित मुलीवर अत्याचार करुन तिच्याशी गैर वर्तन करणाऱ्या नराधमास...

read more
उज्जैन येथील प्रसिध्द महाकाल मंदिरात भस्म आरती दरम्यान आग – सुदैवाने जीवितहानी नाही

उज्जैन येथील प्रसिध्द महाकाल मंदिरात भस्म आरती दरम्यान आग – सुदैवाने जीवितहानी नाही

मध्य प्रदेशातील उज्जैन येथील प्रसिद्ध असलेल्या महाकाल मंदिराच्या गर्भगृहात आज सोमवारी भस्म...

read more
नांदगाव सह येवला, मालेगावात उष्माघाताच्या लाटेची शक्यता; 112 प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उष्माघात कक्ष

नांदगाव सह येवला, मालेगावात उष्माघाताच्या लाटेची शक्यता; 112 प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उष्माघात कक्ष

मनमाड - मार्च महिन्यातच जिल्ह्यात तापमान ३३ ते ३५ अंशांवर पोचल्याने उष्णतेची लाट जाणवू लागली आहे....

read more
ओम मित्र मंडळ संचालित श्रीराम जन्मोत्सव समिती मनमाड 2024 – जाहीर बैठक                             

ओम मित्र मंडळ संचालित श्रीराम जन्मोत्सव समिती मनमाड 2024 – जाहीर बैठक                             

मनमाड - सालाबादप्रमाणे  1986 पासून सलग 38 व्या वर्षी यंदाही श्रीराम मंदिर आठवडे बाजार मनमाड येथे...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]