राज्य परिवहन महामंडळाच्या मालेगांव आगारात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याच्या मुलाने घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण घेण्यास अडथळा येत असल्याच्या नैराश्येतु आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
गणेश शिंदे असे युवकाचे नाव असुन घराच्या आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणासाठी पुरेसे पैसे नसल्याने शिक्षण पूर्ण होणार नाही या विवंचनेत त्याने असे पाऊल उचलले.
गणेशचे वडील हे मालेगाव बस आगारात नोकरी करत असून त्यास पुढील उपचारासाठी संकल्प हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे.













