Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मराठी साहित्य संमेलनास नामको बँकेची ११ लाखांची मदत !

Nov 1, 2021

९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक शहरात संपन्न होणार आहे. जिल्ह्यातील अग्रगण्य असलेली दि नाशिक मर्चट को–ऑप बँकेने साहित्य संमेलनासाठी ११ लाख रुपयांचा निधी जाहीर केला आहे. सदर रकमेचा धनादेश संमेलनाचे स्वागताध्यक्ष व जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. 

नाशिक मर्चट को ऑप बँकेचे चेअरमन हेमंत धात्रक यांनी सोमवारी माजी मंत्री जयकुमार रावल, पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत सदर धनादेश जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांचेकडे सुपूर्द केला. संमेलनासाठी अनेक संस्था मदत करीत असून यापुढेही संस्थांनी पुढे यावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. यावेळी नामको बँकेचे चेअरमन हेमंत धात्रक, उपाध्यक्ष प्रकाश दायमा, जनसंपर्क संचालिका शोभा छाजेड, ज्येष्ठ नेते व संचालक वसंत गीते, सोहनलाल भंडारी, विजय साने यांच्यासह संचालक मंडळातील सदस्य उपस्थित होते. साहित्य संमेलनाचे प्रमुख कार्यवाह जयप्रकाश जातेगावकर यांनी नामको बँकेच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.

अजून बातम्या वाचा..

चांदवड महाविद्यालयामध्ये रानभाज्या प्रदर्शन व वन्यजीव छायाचित्रण प्रदर्शनाचे आयोजन !

चांदवड येथील एसएनजेबी संचलित आबड कला, लोढा वाणिज्य व जैन विज्ञान महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र...

read more

राज्य परिवहन महामंडळ कर्मचारी उपोषणास नांदगाव तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पाठींबा !

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने जाहीर केलेला 5 टक्के महागाई भत्ता आणि 2500 अत्यल्प दिवाळी भेट...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]