loader image
[ays_poll id=7]

वैजापूरमध्ये बाप-लेकीच्या नात्याला काळीमा !

Nov 3, 2021


राज्यात महिला व मुलींवर होणाऱ्या अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशीच एक मन हेलावून टाकणारी घटना औरंगाबाद जिल्ह्यात घडली आहे.

जिल्ह्यातील वैजापूर येथे अल्पवयीन मुलीवर सावत्र बाप गेल्या वर्षभरापासून लैंगिक छळ करत असल्याची घटना उघडकीस आली आहे. या बापासह आणखी एक जण मुलीवर अत्याचार करत असल्याची खळबळजनक माहिती उघड झाली असून या सगळ्या भयंकर प्रकारासाठी मुलीच्या आईचीही सहमती असल्याचे समोर आले आहे. या सावत्र बापासह अन्य एकजण आणि आई या तिघांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेतील पीडित अल्पवयीन मुलगी 14 वर्षीय असून ती औरंगाबाद येथील एका वसतिगृहात शिक्षण घेत होती. परंतु तिच्या पायाची शस्त्रक्रिया झाल्यामुळे ती तिच्या आईकडे राहण्यासाठी आली होती. परंतु सावत्र बापाची या मुलीवर वाईट नजर होती. तो तिच्यासोबत वारंवार अश्लील चाळे करत होता. एवढेच नव्हे तर शेजारी राहणारा आणखी एक जणही तिचा लैंगिक छळ करत होता. हे कृत्य मुलीने आईच्या कानावर घातले तेव्हा आईने मुलीची साथ न देता शेजारी जसे सांगतो, तसे कर असे सांगितले. तसेच पीडित मुलीला मारहाण केली.

मुलीवर सतत अत्याचार करणाऱ्या या दोघांनी वर्षभरापासून तिचा छळ केला. हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही तर 24 ऑक्टोबर रोजी बापाने मुलीच्या गुप्तांगात मिरची पूड टाकून क्रौर्याची सीमा गाठली. त्रास होऊ लागल्यावर मुलगी शहरातील लक्ष्मीनगर परिसरातील तिच्या मावशीकडे पळून गेली. ती मावशीकडे गेल्यानंतर धमक्या देण्यासाठी इतरांना पाठवले गेले. पण मावशीने त्यांना पिटाळून लावत थेट वैजापूर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. हा घृणास्पद प्रकार ऐकून पोलिस यंत्रणाही चक्रावून गेली. या पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून सावत्र बापासह आई व अन्य एकजण अशा तिघांविरोधात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमान्वये वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


अजून बातम्या वाचा..

चांदवड महाविद्यालयामध्ये रानभाज्या प्रदर्शन व वन्यजीव छायाचित्रण प्रदर्शनाचे आयोजन !

चांदवड महाविद्यालयामध्ये रानभाज्या प्रदर्शन व वन्यजीव छायाचित्रण प्रदर्शनाचे आयोजन !

चांदवड येथील एसएनजेबी संचलित आबड कला, लोढा वाणिज्य व जैन विज्ञान महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र...

read more
राज्य परिवहन महामंडळ कर्मचारी उपोषणास नांदगाव तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पाठींबा !

राज्य परिवहन महामंडळ कर्मचारी उपोषणास नांदगाव तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पाठींबा !

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने जाहीर केलेला 5 टक्के महागाई भत्ता आणि 2500 अत्यल्प दिवाळी भेट...

read more
.