loader image

दिवाळीनिमित्त चव्हाण कुटुंबाने साकारली “रायगड किल्याची” प्रतिकृती…..!

Nov 4, 2021

महाराष्ट्रात दिवाळी मध्ये घरगुती किल्ला बनवणे ही अनेक वर्षांपासून चालत असणारी परंपरा आहे. सध्याच्या डिजिटल युगात ही परंपरा काही प्रमाणात मागे पडत असताना दिसत आहे. दिवाळीतील हीच परंपरा जपण्याचे काम हे मनमाड येथील चव्हाण कुटुंब दरवर्षी करत असतात.

मनमाड येथील सिव्हिल इंजिनिअर विक्रम चव्हाण आणि अमर चव्हाण हे गेल्या पाच ते सहा वर्षांपासून दिवाळी मध्ये महाराष्ट्रातील आपल्या शौर्याचा इतिहास सांगणारे गड-किल्ले यांची प्रतिकृती साकारत असतात. घरातील तसेच शहरातील लहान मुलांना आपल्या गड-किल्यांच्या इतिहासाची माहिती मिळावी, या उद्देशाने हे किल्यांची निर्मिती करत असतात. मागील वर्षी चव्हाण परिवाराकडून प्रतापगड किल्याची सुंदर प्रतिकृती साकारण्यात आली होती. यंदाच्या वर्षी छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी असणाऱ्या किल्ले ‘रायगडाची’ प्रतिकृतीची निर्मिती केली आहे. यामध्ये श्री तुळजाभवानी मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज समाधी, श्री जगदीश्वर मंदिर, नगारखाना, बाजारपेठ, गंगासागर तलाव, हिरकणी बुरुज, टकमक टोक अशी रायगडावरील महत्वाची ठिकाणे दाखवण्यात आली आहे.

गड निर्मिती करण्यासाठी दगड, माती, विटा, पोते आदी प्रकारच्या पर्यावरण पुरक वस्तुंचा वापर करण्यात आलेला असुन किल्ला बनवण्यासाठी शिवराज चव्हाण, श्रावणी चव्हाण, सेजल चव्हाण, आराध्य चव्हाण, रीतिक चव्हाण, आदित्य चव्हाण, वेदांत निकम आदींनी परिश्रम घेतले.

अजून बातम्या वाचा..

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

दिनांक 26/8/2025 रोजी के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र...

read more
भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

आज दि.२६ ऑगस्ट २०२५ रोजी शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय...

read more
मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड - बुधवार दिनांक 27 /08/2025 रोजी भाद्रपद शुध्द श्री गणेश चतुर्थी निमित्त सकाळी ठीक 09-30...

read more
मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर मंडलाच्या वतीने स्वतंत्र हिंदुस्थान च्या 79 व्या स्वातंत्र्य दिना...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला....

read more
नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

मनमाड -- नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात...

read more
.