Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आरोग्य व दीर्घ आयुष्यासाठी मुस्लिम बांधव व शिवसैनिकांतर्फे दुवा पठण!

Nov 11, 2021

गेल्या सुमारे दोन वर्षांपासून देशासह महाराष्ट्र हा कोविडशी मुकाबला करत आहे. एकीकडे या विषाणूशी लढाई सुरू असताना दुसरीकडे महाराष्ट्रतील जनतेचा जीवनचक्र सुरू राहावं, राज्यातली विकास कामं सुरूच राहावीत म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा,उद्धव ठाकरे साहेब हे न थांबता सातत्यानं प्रयत्न करत होते. या सर्व कार्यात साहेबांना मान देखील वर करायला वेळ मिळत नव्हती, आपल्या राज्यासाठी मा,मुख्यमंत्री साहेबांनी स्वताच्या मानेच्या आजारावर दुखण्याकडे दुर्लक्षच केले होते,परिणामी मानेचा त्रास वाढला, दुखण्यावर व्यवस्थित उपचार व्हावेत यादृष्टीनं डॉक्टरांनी सल्ला दिल्यावरून मुख्यमंत्री साहेब हे रुग्णालयात दाखल झाले आहे त्यांच्यावर योग्य ते उपचार केले जाणार आहे,
म्हणून मनमाड शहर मुस्लिम बांधव व शिवसैनिकां तर्फे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा,उद्धव ठाकरे साहेबांच्या उत्तम आरोग्यासाठी व दीर्घ आयुष्यासाठी,साहेबांची तब्येत लवकरच बरी होवो या साठी आज मनमाड येथील हजरत घोडेपीर बाबा दर्ग्यावर चादर चढवून साहेबांच्या आरोग्य व दीर्घ आयुष्यासाठी दुवा पठण करण्यात आली आहे, या वेळी मौलाना वसीम, मुस्लिम समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते रऊफ मिर्झा, अल्ताफबाबा खान, शिवसेना शहरप्रमुख मयूर बोरसे, कयाम सैय्यद, फिरोज शेख,कादिर शेख, आबीद सर,जाहिद शेख,मुराद शेख,इरफान मोमीन,अमजद शेख,अल्ताफ शाह,शकुर शेख, नासीर खान आदीं मुस्लिम बांधवांन सोबत प्रवीण धाकराव, योगेश इमले, संजय कटारिया, स्वराज देशमुख, महेंद्र गरुड सोबत इतर शिवसैनिक देखील उपस्तीत होते,

अजून बातम्या वाचा..

नांदगाव शहरातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नारधमावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल

नांदगाव शहरातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नारधमावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल

नांदगाव : प्रतिनिधी येथील अल्पवयीन पीडित मुलीवर अत्याचार करुन तिच्याशी गैर वर्तन करणाऱ्या नराधमास...

read more
उज्जैन येथील प्रसिध्द महाकाल मंदिरात भस्म आरती दरम्यान आग – सुदैवाने जीवितहानी नाही

उज्जैन येथील प्रसिध्द महाकाल मंदिरात भस्म आरती दरम्यान आग – सुदैवाने जीवितहानी नाही

मध्य प्रदेशातील उज्जैन येथील प्रसिद्ध असलेल्या महाकाल मंदिराच्या गर्भगृहात आज सोमवारी भस्म...

read more
नांदगाव सह येवला, मालेगावात उष्माघाताच्या लाटेची शक्यता; 112 प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उष्माघात कक्ष

नांदगाव सह येवला, मालेगावात उष्माघाताच्या लाटेची शक्यता; 112 प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उष्माघात कक्ष

मनमाड - मार्च महिन्यातच जिल्ह्यात तापमान ३३ ते ३५ अंशांवर पोचल्याने उष्णतेची लाट जाणवू लागली आहे....

read more
ओम मित्र मंडळ संचालित श्रीराम जन्मोत्सव समिती मनमाड 2024 – जाहीर बैठक                             

ओम मित्र मंडळ संचालित श्रीराम जन्मोत्सव समिती मनमाड 2024 – जाहीर बैठक                             

मनमाड - सालाबादप्रमाणे  1986 पासून सलग 38 व्या वर्षी यंदाही श्रीराम मंदिर आठवडे बाजार मनमाड येथे...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]