आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या स्थानिक विकास निधीतून पिंपराळे गावातील मंदिरासमोर सभागृहासाठी सुमारे 10 लाख रुपये मंजूर करण्यात आले. या सभागृहाचे भूमिपूजन शिवसेना नांदगाव शहरप्रमुख सुनील भाऊ जाधव तसेच आदिवासी समाज व संघटक भाऊराव भाऊ बागुल यांच्या हस्ते संपन्न झाले याप्रसंगी सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते आदींसह पिंपळे गावातील समस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

दोन सुवर्ण पाच रौप्यपदकासह राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाड च्या खेळाडूंची चमकदार कामगिरी पूजा परदेशी आनंदी सांगळे ला सुवर्णपदक
बारामती येथे १६ ते १८ ऑगस्ट २०२४ दरम्यान संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग स्पर्धेत जय...










