संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या विधान परिषदेच्या सहा जागांसाठी सध्या निवडणूक होत आहे. त्यात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असे चित्र आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष आहे. मात्र, यातील एक जागा बिनविरोध करण्यात यश आले आहे. काँग्रेसच्या उमेदवार प्रज्ञा सातव या बिनविरोध विजयी झाल्या आहेत. भाजपने त्यांच्या विरोधातील उमेदवारी मागे घेतल्यामुळे निवडणूक बिनविरोध झाली. प्रज्ञा या काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नेते राजीव सातव यांच्या पत्नी आहेत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महाविकास आघाडीने विशेष प्रयत्न केले. या निवडीबद्दल निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी प्रज्ञा सातव यांना निवडीचे प्रमाणपत्र दिले आहे. याप्रसंगी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आदी उपस्थित होते.
भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन
मनमाड - आम्ही परंपरा पाळतो... आम्ही संस्कृती चे रक्षण करतो.... हे ब्रीद घेऊन मनमाड शहरात धार्मिक...










