loader image

वर्चस्वाच्या वादातून प्रवीण काकडची हत्या : ३ मारेकर्यांना अटक !

Nov 23, 2021


नाशिकच्या पंचवटी परिसरात झालेल्या प्रवीण काकड या युवकाच्या खुनातील 3 मारेकऱ्यांना म्हसरुळ पोलिसांनी अटक केली आहे. वर्चस्वाच्या वादातून हा खून झाल्याचे प्राथमिक पोलीस तपासात समोर आले आहे. मृत प्रवीण काकड याचीही गुन्हेगारी पार्श्वभूमी होती आणि याच वादातूनच हा खून झाल्याचे समजते.

प्रवीण हा काही दिवसांपूर्वी जामिनावर तुरुंगाबाहेर आला होता. काही दिवसापूर्वी अज्ञात व्यक्तींनी त्याचा निर्घृण खून केल्याची घटना पंचवटी परिसरात म्हसरुळ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आडगाव लिंक रोडवर घडली होती. प्रवीण तरुण मित्रांसोबत रोहिणी हॉटेलजवळ मद्यपान करत बसला होता. त्याचवेळी काही अज्ञात व्यक्तींनी तेथे येऊन धारदार हत्याराने प्रवीणवर वार केले. या हल्ल्यात प्रवीणचा जागीच मृत्यू झाला होता.

प्रवीण एका सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगा असून, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी होती. काही दिवसांपूर्वीच तो जामिनावर सुटून बाहेर आला होता. त्याच्यावर पोलिसात गंभीर गुन्हे दाखल होते. त्यामुळे पूर्ववैमनस्यातूनच हा खून झाला असावा, असा पोलिसांना संशय होता. त्याच्या मृतदेहाजवळ मद्याच्या बॉटल आढळून आल्या होत्या. प्रवीणच्या खुन प्रकरणी तीन मारेकऱ्यांना म्हसरुळ पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हा खून वर्चस्वाच्या वादातून झाल्याचे समोर आले आहे. 


अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ – लासलगाव येथे सराफी दुकानात भरदिवसा तीन तोळ्याची पोत चोरण्याचा प्रयत्न

बघा व्हिडिओ – लासलगाव येथे सराफी दुकानात भरदिवसा तीन तोळ्याची पोत चोरण्याचा प्रयत्न

लासलगाव ( ठिणगी वृत्तसेवा ) लासलगाव शहरातील मेनरोड वरील अत्यंत वर्दळ असलेल्या ठिकाणी एका नामांकित...

read more
भर बाजारपेठेत झालेल्या चोरी बाबत व्यापारी महासंघातर्फे पोलीस स्टेशनला निवेदन

भर बाजारपेठेत झालेल्या चोरी बाबत व्यापारी महासंघातर्फे पोलीस स्टेशनला निवेदन

मनमाड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या एकात्मता चौक येथील दुकानांमध्ये 21 फेब्रुवारीच्या रात्री...

read more
१५००० ची लाच स्वीकारताना येवला तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्य ए सी बी च्या जाळ्यात

१५००० ची लाच स्वीकारताना येवला तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्य ए सी बी च्या जाळ्यात

येवला - ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कामात अडथळा न आणण्याच्या मोबदल्यात येवला तालुक्यातील बदापूर...

read more
.