loader image

आजपासून राज्यातील सर्व शाळांत ‘माझे संविधान, माझा अभिमान” उपक्रम!

Nov 23, 2021


२६ नोव्हेंबर – संविधान दिनानिमित्त राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘माझे संविधान, माझा अभिमान” उपक्रम राबवण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. आज (दि.२३) पासून या उपक्रमाची सुरुवात होणार असून शुक्रवारी (दि.२६) सकाळी १० वा. एकाचवेळी शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमधून संविधान दिनानिमित्त भारतीय संविधानातील उद्देशिकेचे वाचन केले जाणार आहे.

सर्व माध्यमांच्या प्राथमिक ते उच्च माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबवले जाणार आहेत. शालेयस्तरावर निबंध लेखन, काव्यलेखन, चित्रकला-वक्तृत्व स्पर्धा, घोषवाक्ये-पोष्टर निर्मिती असे उपक्रम ऑफलाइन आणि ऑनलाइन अशा स्वरुपात राबवायचे आहेत. त्यात विद्यार्थी, पालक, लोकप्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसह समाजाचा सक्रीय सहभाग विभागाला अपेक्षित आहे. विद्यार्थी आणि पालकांना संविधानाची माहिती व्हावी यासाठी संविधानावर आधारित प्रश्‍नमंजुषा, संविधानिक मूल्ये आणि त्यांचा शालेय अभ्यासक्रमात समावेश, संविधान आणि शिक्षण या विषयावर परिसंवाद, तज्ज्ञांची व्याख्याने घेण्यात येणार आहेत.


अजून बातम्या वाचा..

ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

  पुणे - जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ग्रंथालयांना अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी, शासन प्रयत्न...

read more
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त उत्कृष्ट चित्ररथांना भीमोत्सव तर्फे दिली जाणार रोख पारोषिक

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त उत्कृष्ट चित्ररथांना भीमोत्सव तर्फे दिली जाणार रोख पारोषिक

मनमाड - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भीमोत्सव आयोजन समितीच्या वतीने उत्कृष्ठ...

read more
.