loader image
[ays_poll id=7]

१३ डिसेंबर : क्रांतिवीर वसंतराव नाईक जयंती !

Dec 13, 2021

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात नाशिक जिल्ह्यातील सोनेरी पान म्हणून ज्यांचा उल्लेख करता येईल असे नाव म्हणजे क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक. वडिलांच्या सावकारीच्या कर्जवह्या फाडून स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होत देशासाठी आजन्म अविवाहित राहत देशसेवेला वाहून घेणा-या या थोर क्रांतिकारकाचा १३ डिसेंबर त्यांच्या जयंती निमित्त अल्प परिचय…

अवघ्या पंधराव्या वर्षी गांधीजींच्या विचाराने प्रेरित होऊन या क्रांतिकारकाने स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला. मिठाच्या सत्याग्रह चळवळीतील सहभागाबद्दल त्यांनी 18 व्यावर्षी सक्तमजुरीची शिक्षा भोगली. यानंतर त्यांनी 1932, 1939, 1942 आणि 1944 मध्येही तुरुंगवास भोगला. बिहारमध्ये झालेल्या भूकंपानंतर नगराध्यक्षपदाचा त्यांनी त्याग केला आणि मदत कार्यासाठी बिहारकडे धाव घेतली होती. बिहारमधून परतताच मनमाडकरांनी त्यांना बिनविरोध नगराध्यक्ष बनविले.

1937 मध्ये ते सर्वात कमी वयाचे सदस्य म्हणून मुंबई असेंब्लीत निवडून गेले. 1942 च्या चळवळीतही त्यांनी इंग्रजांच्या विरोधात लढा दिला. इंग्रजांनी त्यांच्या मालमत्तेचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला. मात्र, लिलावात कोणीही सहभागी झाले नाही. यावरूनच त्यांची लोकप्रियता लक्षात येते. अच्युतराव पटवर्धन, साने गुरुजी, एस. एम. जोशी आदींसोबत त्यांनी देशसेवा केली. वसंतरावांनी जिल्ह्यात सुमारे सात वर्षे कॉँग्रेसचे अध्यक्षपद भूषविले. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेस कमिटीचे सरचिटणीसपद आणि अखिल भारतीय कॉँग्रेसचे सभासद होण्याचाही बहुमान त्यांना मिळाला. नाशिकला 1950 मध्ये झालेले अखिल भारतीय कॉँग्रेसचे 56वे अधिवेशन यशस्वी करण्यातही त्यांचा सिंहाचा वाटा होता.

नाशिक मतदारसंघातून ते पाचवेळा विधानसभेवर निवडूनही गेले. तत्कालीन सिन्नर-निफाड या विधानसभा मतदारसंघाचेही प्रतिनिधित्व त्यांनी केले. 14 डिसेंबर 1968 रोजी भुसावळ येथे कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कामगारांसमोर भाषण करत असतानाच हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने वसंतरावांची प्राणज्योत मालवली.

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर मंडलाच्या वतीने स्वतंत्र हिंदुस्थान च्या 79 व्या स्वातंत्र्य दिना...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला....

read more
नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

मनमाड -- नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात...

read more
फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन - श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा ! फलक रेखाटन...

read more
मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड - 79 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्ये ला 14 ऑगस्ट या अखंड भारत दिना निमित्ताने...

read more
.