loader image

तब्बल 21 वर्षांनंतर मिस युनिव्हर्सचा किताब भारतात !

Dec 13, 2021


भारताने तब्बल 21 वर्षांनंतर मिस युनिव्हर्सचा किताब पटकावला आहे. हा दिवस सर्व भारतीयांसाठी गर्वाचा क्षण आहे. विजय फक्त आणि फक्त हरनाझ कौर संधूमुळे भारताला मिळाला असं म्हणायला हरकत नाही. हा विजय एकट्या हरनाझनसून संपूर्ण भारताचा आहे. मिस युनिव्हर्सच्या किताबासाठी हरनाझने मेहनत केली, यात काही शंका नाही. पण तिला मेहनत करण्यासाठी मोठं स्वप्न पाहण्यासाठी प्रेरणा देणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणीनसून हरनाझची आई आहे. 

हरनाझने फार पूर्वी  मिस युनिव्हर्स होण्याचं स्वप्न पाहिलं. अनेक वर्षांनंतर आज तिचं स्वप्न पूर्ण झालं आहे. हरनाझने सोशल मीडियावर आईसाठी पोस्ट शेअर केली आहे. आईसोबत फोटो शेअर करत तिने तिच्या यशाचं पूर्ण श्रेय आईला दिलं आहे. माझी आई माझी सर्वात मोठी प्रेरणा आहे… असं हरनाझ म्हणाली. 

‘आई माझ्या स्वप्नांची निर्माती आहे. तुझ्या शिवाय काही शक्य नाही. फक्त निर्माती नाही तर माझ्या स्वप्नांची आई लिडर आहे.  तू जशी आहेस तशी खंबीर राहा. मला आणि इतरांना प्रेरणा देत राहा! असं म्हणतात, ‘आईच्या प्रेमाला सीमा नाही; ते बिनशर्त आहे.. ‘ असेही हरनाझ म्हणाली. 


अजून बातम्या वाचा..

अभिनेत्री पूजा सावंत, चिन्मय उदगीरकर यांना सुविचार गौरव पुरस्कार : नाशिकमध्ये होणार सन्मान !

अभिनेत्री पूजा सावंत, चिन्मय उदगीरकर यांना सुविचार गौरव पुरस्कार : नाशिकमध्ये होणार सन्मान !

सुप्रसिद्ध अभिनेत्री पूजा सावंत आणि सुप्रसिद्ध अभिनेता चिन्मय उदगीरकर यांना नाशिकमधील अत्यंत...

read more
.