गेल्या अनेक दिवसापासून सुरु असलेले एसटी कर्मचारी आंदोलन दिवसेंदिवस अधिक तीव्र होत आहे. काल अजय गुजर यांनी संपातून माघार घेतल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी अजय गुजर कोण ? आम्ही त्यांना ओळखत नाही आणि हे आंदोलन कोणत्याही संघटनेचे नाही, जोपर्यंत विलीनीकरण होत नाही, तोवर आमचा लढा सुरू राहणार आहे. हा लढा हा कर्मचाऱ्यांचा लढा आहे, अशी भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. मुंबई येथील आझाद मैदानात सध्या थंडीत एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. अनेक आगारातील कर्मचारी आझाद मैदानात आहेत, त्यामुळे कर्मचाऱ्यांनी हा संप आणखी तीव्र केल्याचे दिसून येत आहे.
परिषदेच्या राज्यस्तरीय आदर्श जिल्हा आणि तालुका पत्रकार संघ पुरस्कारांची घोषणा
*परभणी जिल्ह्याला आदर्श जिल्हा संघाचा पुरस्कार* *बेला, चामोर्शी, मनमाड, पनवेल, आंबेगाव,...











