Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

धिवर, पगारे यांचा सत्कार

Dec 29, 2021

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना शाखा चे कार्यकारिणी सदस्य कल्याण धिवर यांचा वाढदिवसानिमित्त व कार्यालय सचिव संदीप पगारे यांना रेल्वेचा पी.सी.ओ.अॅवार्ड मिळाल्याबद्दल ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना शाखा तर्फे सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून झोनल सचिव सतिश भाऊ केदारे, झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविणभाऊ अहिरे, विजय भाऊ गेडाम, ओपन लाईन शाखा चे अध्यक्ष प्रदीप भाऊ गायकवाड, कारखाना शाखा चे उपाध्यक्ष सागर गरूड, सुभाष जगताप, कारखाना शाखा चे वरीष्ठ उपाध्यक्ष संदिप पगारे, ज्युनिअर इन्स्टिट्यूट ऑफ मनमाड चे सचिव संदीप धिवर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन शरद झोंबाड यांनी केले तर आभारप्रदर्शन बहुजन युवक संघ चे अध्यक्ष रोहित भोसले यांनी केले.
यावेळी सतिश भाऊ केदारे, विनोद खरे,सागर गरूड, सचिन इंगळे, संदिप धिवर, संदिप पगारे, अर्जुन बागुल, किरण आहीरे, किरण वाघ, साईनाथ लांडगे आदी चे भाषणे झाली.
कार्यक्रमाचे आयोजन प्रेमदिप खंडताळे, प्रदीप अहिरे, निखिल सोनवणे, फकिरा सोनवणे,हर्षद सुर्यवंशी, प्रभाकर निकम आदी ने केले.

अजून बातम्या वाचा..

महिलेच्या गळ्यातील पोत ओरबाडून चोरटे पसार; शहरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण

महिलेच्या गळ्यातील पोत ओरबाडून चोरटे पसार; शहरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण

मनमाड- शहरातील अत्यंत गजबजलेल्या विवेकानंद नगर दोन परिसरात राहणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]