Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

शाळा, महाविद्यालयांमध्ये लवकरच लसीकरण मोहीम – डॉ.जगताप

Dec 30, 2021

कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर लसीकरणाकडे नागरिकांचा कानाडोळा झाला आहे तर  कोरोनाच्या ओमीक्रोनचा धोकाही वाढत आहे. त्यामुळे
अनेकांचे पहिले, दुसरे लसीकरण करण्यासह बुस्टर डोसही द्यावा लागणार आहे. त्यात पुन्हा १५ ते १८ वर्षातील मुलांचेही लसीकरण करावे लागणार असल्याने लाभार्थीची संख्या निश्चितीसह लसीकरणाचे नियोजन आदेशानुसार करावे लागणार असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ जगताप यांनी सांगितले त्यामुळे नववर्षांत लसीकरणाचे आव्हान तालुक्यातील आरोग्य यंत्रणेसमोर असणार आहे.

कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर लसीकरणाचा वेग मंदावला आहे. मनमाड शहरात आज पर्यंत (ता२९) ३९ हजार ६२९ जणांना कोरोना प्रतिबंधात्मक पहिला डोस देण्यात आला आहे. तर १७ हजार ६०० जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. त्यात पहिला डोस घेतल्यानंतर अनेकांनी दुसरा डोस घेण्याचे टाळल्याचे चित्र आहे. त्यामुळे आरोग्य विभागाला चौकाचौकात लसीकरण केंद्र करून कोरोना लस घेतली की नाही ही तपासून लसी देण्याची वेळ आली आहे. शहरात ५ तर तालुक्यात २० लसीकरण केंद्र आहेत. मात्र, लस घेण्यासाठी नागरिकांकडून प्रतिसाद मिळत नाही. परिणामी लसीकरणाचा टक्का वाढण्यास तयार नसल्याचे विदारकचित्र सध्या पाहण्यास मिळत आहे.
त्यात आता १५ ते १८ वयोगटातील मुलांचे ही कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू होणार आहे. त्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ जगताप यांनी सांगितले की प्राप्त झाल्यास तयारी सुरू करणार असल्याचे सांगितले लवकरच शिक्षण विभागाकडून शाळेतील विद्यार्थ्यांची माहिती घेतली जाणार आहे. त्यानंतर तालुका आरोग्य विभागाकडून शाळा, कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण महाविद्यालयांमध्ये शिबिरांचे आयोजन करावे लागणार आहे. तर वाढत्या कोरोनाचा धोका पाहता दुसरीकडे बुस्टर डोसही द्यावे लागणार आहे. तर बुस्टर डोससाठी कोरोना लसीकरणाचा दुसरा डोस घेऊन नऊ महिने पूर्ण झाले पाहिजे.  लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी सुरू असलेल्या कोरोना लसीकरण कायम ठेवत, १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण आणि बुस्टर डोस देण्यासाठी आरोग्य विभागाला आता तीन स्तरावर लसीकरणाचे काम करण्याचे कसर करावी लागणार आहे.

प्रतिक्रिया

नांदगाव तालुक्यात लसीकरणाकडे लक्ष देऊन उद्दिष्ट पूर्ण करण्याकडे भर दिला जात आहे. तर तिसरा बूस्टर डोस आणि १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्यात येणार असून आदेशप्राप्त झाल्यास लसीकरण सुरू करण्यात येईल मुलांचे लसीकरण शाळा कोलेज मध्ये जाऊन केले जाणार आहे.
– डॉ संतोष जगताप, तालुका आरोग्य अधिकारी

मनमाड – ४९२६३ पात्र लाभार्थ्यांपैकी ३९६२९ लाभार्थ्यांनी पहिला डोस घेतला तर १७६०० लाभार्थ्यांनी दुसरा डोस घेतला आहे यात पहिला डोस घेणारे ९६३४ तर दुसरा डोस घेणारे २२०२९ लाभार्थी बाकी आहेत

नांदगाव ग्रामीण – १५२१९८ पात्र लाभार्थ्यांपैकी १२४२९८ लाभार्थ्यांनी पहिला डोस घेतला तर ४८५१२ लाभार्थ्यांनी दुसरा डोस घेतला आहे यात पहिला डोस घेणारे २७९०० तर दुसरा डोस घेणारे ७५८८६ लाभार्थी बाकी आहेत

नांदगाव तालुका – २१८८०५ पात्र लाभार्थ्यांपैकी १७७५७६ लाभार्थ्यांनी पहिला डोस घेतला तर ७५८७० लाभार्थ्यांनी दुसरा डोस घेतला आहे यात पहिला डोस घेणारे ४१२२९ तर दुसरा डोस घेणारे १०१७०६ लाभार्थी बाकी आहेत

अजून बातम्या वाचा..

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित आमंत्रिताच्या T20 स्पर्धेसाठी भुमी क्रिकेट अकॅडमीतील शुभम बिडगरची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन संघात निवड करण्यात आली.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित आमंत्रिताच्या T20 स्पर्धेसाठी भुमी क्रिकेट अकॅडमीतील शुभम बिडगरची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन संघात निवड करण्यात आली.

  नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन संघाची निवड चाचणीत विविध जिल्ह्य़ातील व तालुक्यातुन...

read more
महाबँक आर-सेटी ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण सस्थेतर्फे मोफत 6 दिवसाचे उद्योजकता विकास प्रशिक्षण शिबिराचा निरोप समारंभ 

महाबँक आर-सेटी ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण सस्थेतर्फे मोफत 6 दिवसाचे उद्योजकता विकास प्रशिक्षण शिबिराचा निरोप समारंभ 

८  मार्च महिला दिनानिमित्त ओढा ता- नाशिक येथे आयोजित करण्यात आला होता सदर प्रशिक्षण कार्यक्रमाचे...

read more
नांदगाव तालुक्यातील बाणगाव येथे महाशिवात्रीनिमित्त श्री बाणेश्वराची यात्रा बाणगाव देवस्थान प्रती दक्षीण काशी

नांदगाव तालुक्यातील बाणगाव येथे महाशिवात्रीनिमित्त श्री बाणेश्वराची यात्रा बाणगाव देवस्थान प्रती दक्षीण काशी

नांदगाव सोमनाथ घोंगाणे श्रीराम अवतारामध्ये मारीच नावाच्या राक्षसाच्या मागे प्रभु श्रीराम शिकारसाठी...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]