Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

प्रशासक म्हणून नगर परीषदेचे मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार मुंढे यांनी आज गुरुवारी पदाची सूत्रे हाती घेतली

Dec 30, 2021

नगर परीषदेच्या सभागृहाची मुदत बुधवारी संपल्यानंतर प्रशासक म्हणून नगर परीषदेचे मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार मुंढे यांनी आज गुरुवारी पदाची सूत्रे हाती घेऊन कामकाजाला सुरुवात केले.  मनमाड नगरपरीषदेची सार्वत्रिक निवडणूक २०१६ मध्ये झाल्यानंतर २९ डिसेंबर २०२१ पर्यंत लोकप्रतिनिधींची सत्ता होती. नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा पाच वर्षाचा कार्यकाळ बुधवारी संपुष्टात आल्यानंतर शासनाच्या आणि जिल्हा अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार प्रशासक म्हणून मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार मुंढे यांची नियुक्ती करण्यात आली. मुदत संपल्याने डॉ. मुंढे यांनी तातडीने नगरपरिषद प्रशासन पदाची सूत्रे हाती घेतली. लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ .द्मावती धात्रक यांच्या नेतृत्वाखालील नगरसेवक यांनी पाच वर्ष नगरपरीषदेच्या माध्यमातून विविध विकास कामे करण्याचा प्रयत्न केला. पण कोरोना महामारीमुळे नगर परीषदेच्या विकासाला मोठ्या मर्यादा आल्या. तरीदेखील सत्ताधारी गटाने प्रशासनाच्या मदतीने कोरोना काळातही चांगल्या नागरी सुविधा देण्याचा आटोकाट प्रयत्न केला. अनेक प्रभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर विकास कामे झाली. कोरोनाच्या संक्रमणामुळे नवीन निवडणुका केव्हा होतील याबाबत कोणतीही स्पष्टता दिसत नसल्याने इच्छुक उमेदवारांचा जीव टांगणीला लागला आहे. सार्वत्रिक निवडणूक सभागृह स्थापित होईपर्यंत प्रशासकहेच नगरपरिषदेची व शहराचे प्रमुख म्हणून काम पाहणार आहेत. सध्या बसलेल्या प्रशासक पाहता या अगोदरही मनमाड पालिकेवर प्रशासक बसले आहेत मनमाड नगरपालिकेत तब्बल २८ वर्षांनंतर प्रशासकीय राजवट लागू झाली आहे. यापूर्वी मनमाड नगरपालिकेत आठ वेळेला प्रशासकीय राज्य होते.

अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयात उपजिल्हा रुग्णालय मनमाड यांच्या सहकार्याने जागतिक हिपॅटायटीस दिन साजरा

मनमाड महाविद्यालयात उपजिल्हा रुग्णालय मनमाड यांच्या सहकार्याने जागतिक हिपॅटायटीस दिन साजरा

मनमाड येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात उप जिल्हा...

read more
आ.सुहासअण्णा कांदे यांच्या विशेष प्रयत्नातून मल्हारवाडी ( ता.नांदगाव ) येथे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून व २० लक्ष रुपये निधी मंजूर

आ.सुहासअण्णा कांदे यांच्या विशेष प्रयत्नातून मल्हारवाडी ( ता.नांदगाव ) येथे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून व २० लक्ष रुपये निधी मंजूर

आ.सुहासअण्णा कांदे यांच्या विशेष प्रयत्नातून मल्हारवाडी ( ता.नांदगाव ) येथे महाराष्ट्र ग्रामीण...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]