loader image
[ays_poll id=7]

मणीपुर घटनेच्या निषेधार्थ नांदगावला मुक मोर्चा

Jul 27, 2023


नांदगाव सोमनाथ घोंगाणे
मनीपुर मध्ये महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात “आम्ही भारताचे लोक ” हा बॅनर लावून नांदगाव कराच्या वतीने आज मूक मोर्चा काढण्यात आला. मणिपूरच्या क्रूर घटनेमुळे भारतीय समाजासमोर जे आव्हान निर्माण झाले आहे. त्याचा सामना करून संविधानिक मूल्य बळकट करणे आवश्यक आहे.याचा विचार करून त्यासाठी नांदगाव शहरात आम्ही भारताचे लोक या नावाने मूक मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चाची सुरुवात डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथून करण्यात आली होती. ही रॅली नांदगाव तहसील कार्यालयात आल्यानंतर विविध संघटनेचे पदाधिकारी यांनी मणिपूरच्या अत्याचाराच्या विरोधात घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त केला. या वेळी प्रशासन नायब तहसीलदार प्रमोद मोरे यांना आम्ही भारतीय लोक यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी नांदगाव मधील सुजाता महिला मंडऴ,रमाई मित्र मंडऴ, आदिवासी जनसमुदाय, एकलव्य संघटना, आधार बहुदेशीय संस्था, वंचित बहुजन आघाड़ी चे वाल्मीक जगताप, भारतीय राष्ट्रीय कांग्रेस चे शहर अध्यक्ष मनोज चोपड़े,शिवसेनेचे अँड सचिन साऴवे, आर .पी. आयचे महावीर जाधव ,अँड विद्या कसबे ‘ अलका रूपवते वाकोडेताई ‘ तानसेन जाधव ‘ राजू गुडेकर, अनिल जाधव ,विश्वास आहिरे, अरुण साऴवे,व असंख्य आर पी आय चे कार्यकर्त, महिला वर्ग या घटनेविरुध्द एकत्र येऊन या मूक मोर्चात मोठया संख्येने सहभागी झाले होते.


अजून बातम्या वाचा..

शिवसेनेच्या तीव्र आंदोलनानंतर पिंपरखेड टोल नाका बंद; पगारवाढ आणि सुविधांसाठी एल्गार!

शिवसेनेच्या तीव्र आंदोलनानंतर पिंपरखेड टोल नाका बंद; पगारवाढ आणि सुविधांसाठी एल्गार!

​नांदगाव : प्रतिनिधी सुमितकुमार जगधने आमदार सुहास कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरखेड (ता....

read more
श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अनिश्चित कालावधीसाठी प्रलंबित राहण्याची शक्यता

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अनिश्चित कालावधीसाठी प्रलंबित राहण्याची शक्यता

राज्यातील 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलंडलेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका घेण्यास सुप्रीम...

read more
.