Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

जनता नागरी पतसंस्थेच्या ठेवीदारांनी केली ना.भारती पवार यांना तक्रार !

Jan 1, 2022

नाशिक जिल्ह्यातील येवला येथील जनता नागरी सहकारी पतसंस्था या संस्थेचे मनमाड येथील कार्यालय 10 ऑगस्ट 2020 पासून पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. मनमाड शहर व परिसरातील सुमारे 300 पेक्षा जास्त ठेवीदारांचे अंदाजे 01 कोटी 90 लाख रुपये ठेवी व अल्पबचत गुंतवणूक स्वरुपात शाखेत जमा आहेत. सदर रक्कम देण्यासाठी पतसंस्था टाळाटाळ करीत आहे. यामध्ये सर्वात जास्त जेष्ठ नागरिक, व्यापारी, छोटे दुकानदार यांची रक्कम अडकली असून येवला तालुका सहकारी पतसंस्था निबंधक व नासिक जिल्हा सहा. निबंधक यांनी देखील या ठेवीदारांचे समस्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आह. याबाबत आज भाजपा नासिक जिल्हा उपाध्यक्ष नितिन पांडे, भाजपा मनमाड शहर अध्यक्ष जयकुमार फुलवाणी, भाजपा व्यापारी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन संघवी, शहर उपाध्यक्ष संदीप नरवडे यांचे नेतृत्वात पतसंस्थेच्या ठेवीदारांनी आणि या संस्थेच्या अल्पबचत प्रतिनिधींनी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्य मंत्री डॉ.भारती पवार यांची भेट घेतली आणि जनता नागरी पतसंस्था येवला यांचे विरोधात लेखी तक्रार केली.

अनेक ठेवीदारांनी या संस्थेच्या गैरकारभारविरुद्ध तक्रारींचा पाढा केंद्रीय मंत्र्यांपुढे वाचला, या संस्थेच्या चार शाखा असून त्या पैकी दोन सुरू आहेत आणि दोन बंद आहेत, संस्था संचालक मंडळ विनाकारण ठेवीदारांच्या ठेवीची रक्कम अडवत असल्याचे नितिन पांडे आणि जयकुमार फुलवाणी यांनी ठेवीदाराची बाजु मांडताना सांगितले. सध्या कोरोना संकट काळामध्ये या पतसंस्थेने बेकायदेशीररीत्या ठेवीदारांच्या रक्कम थांबवून ठेवल्यामुळे अनेक ठेवीदारांची विशेषत: जेष्ठ नागरिकांची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. अल्पबचत प्रतिनिधी संदीप सांगळे, प्रदीप धिवर यांनी देखील ठेवीदारांच्या अडचणी सांगितल्या अत्यंत व्यस्त नियोजन असताना देखील केंद्रीय राज्य मंत्री डॉ.भारती पवार यांनी या संकटग्रस्त ठेवीदार व अल्पबचत प्रतिनिधीशी संवाद केला व त्याच्या व्यथा ऐकून घेतल्या आणि राज्य सरकारच्या वरीष्ठ सहकार अधिकाऱ्यांशी बोलून या ठेवीदारांच्या रक्कम मिळवून देणेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

याप्रसंगी कामगार नेते राजाभाऊ पवार, भाजपा मनमाड शहर संघटन सरचिटणीस नितीन परदेशी, भाजपाचे शहर उपाध्यक्ष बुढन शेख, अनंता भामरे, प्रमोद जाधव, भाजपा दिव्यांग आघाडीचे शहर अध्यक्ष दीपक पगारे, गणेश गंडी, रवींद्र सोनार, संदीप उमाळे, गंगाधर भावे, चेतन सरोदे, मोहन शाकदिपी, कैलास कवडे, प्रवीण जाधव, राम थोरात, धनंजय देशपांडे, प्रियंका धोंडगे आदींसह ठेवीदार उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर चे दमदार अर्धशतक तर युवराज शर्माचे चार बळी

जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर चे दमदार अर्धशतक तर युवराज शर्माचे चार बळी

  रविवार 04 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट आसोसिएशन...

read more
पिंपरी हवेली येथील प्रतिष्ठित कापूस व्यापारी व समाजसेवक योगेश साहेबराव वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश.

पिंपरी हवेली येथील प्रतिष्ठित कापूस व्यापारी व समाजसेवक योगेश साहेबराव वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश.

  पिंपरी हवेली येथील सोसायटीचे माजी चेअरमन शिवाजी दामू वाघ बाळासाहेब वाघ पिंटू गांगुर्डे संजय...

read more
सिटू संघटनेसह विविध नगरपालिका कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र नगरपालिका कर्मचारी कामगार विकास सेनेत जाहीर प्रवेश

सिटू संघटनेसह विविध नगरपालिका कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र नगरपालिका कर्मचारी कामगार विकास सेनेत जाहीर प्रवेश

  "मनमाड शहरात कामगार भवन बांधणार : आमदार सुहास अण्णा कांदे." नांदगाव येथील आमदार निवासस्थानी...

read more
जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर शतकवीर तर मयंक भालेरावची अर्धशतकीय खेळी

जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर शतकवीर तर मयंक भालेरावची अर्धशतकीय खेळी

  गुरुवार 01 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट आसोसिएशन...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]