Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

नांदगाव तालुक्यात पत्रकारांची भक्कम एकजूट विधायक उपक्रम राबविणार; पत्रकार दिनी निर्धार

Jan 7, 2022

नांदगाव तालुक्यात पत्रकार संघाची भक्कम एकजुट तयार करण्याचा निर्धार व्यक्त करत पत्रकारांपुढील बदलती आव्हाने आणि बदलल्या प्रवाहाला सामोरे जाण्यासाठी पत्रकारांची कार्यशाळा सारखे विविध उपक्रम घेण्याचा मानस पत्रकार दिनानिमित्त येथे झालेल्या हितगुज कार्यक्रमात व्यक्त झाला.

नांदगाव तालुका मराठी पत्रकार संघ व नांदगाव तालुका ग्रामीण पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी ६ जानेवारी पत्रकारितेचे आद्य जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिन आययुडीपीतील महात्मा फुले वाचनालयात उत्साहात साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी पत्रकार निलेश वाघ होते. नांदगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे तालुका समन्वयक अमोल खरे, ज्येष्ठ पत्रकार नरेश गुजराथी, अशोक परदेशी, सुरेश शेळके, मारूती जगधने, जगन पाटील, बाबासाहेब बोरसे आदींच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकरांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. जनश्रध्दाच्या संपादिका श्रीमती शकुंतला गुजराथी यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. नांदगाव तालुका मराठी पत्रकार संघ व नांदगाव तालुका ग्रामीण पत्रकार संघ यांचे एकत्रीकरण होऊन यापुढे तालुक्यात पत्रकारांसाठी एकजुटीने विधायक उपक्रमासह विविध प्रश्न आणि समस्यांच्या मागोवा घेण्याचा मनोदय पत्रकारांनी व्यक्त करत या दोन्ही पत्रकार संघटनांच्या एकत्रीकरणाचा उद्देश व कार्याबद्दल तालुका समन्वयक अमोल खरे यांनी आढावा घेतला. पत्रकार सर्वश्री संदीप देशपांडे, सतिष शेकदार, अजय सोनवणे, नरहरी उंबरे, अशोक बिदरी, संजय मोरे, संदीप जेजूरकर, अनिल आव्हाड, सोमनाथ घोंगाणे, प्रमित आहेर, सुरेश नारायणे, तुषार गोयल, सतिष पुणतांबेकर, शंकर विसपुते, अफरोज अत्तार, योगेश म्हस्के, आनंद बोथरा, निलेश्वर पाटील, विजय भावसार, चंचल गंगवाल, निलेश व्यवहारे, रामदास सोनवणे, निखील मोरे, सोमनाथ तळेकर, बापू मार्केड, ज्ञानेश्वर दुकळे, मिलींद वाघ, विशाल मोरे, राजू लहिरे, राजेंद्र धिंगाण, प्रणव खालकर, अपूर्व दातार आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक उपाली परदेशी यांनी तर सूत्रसंचालन सिताराम पिंगळे यांनी केले.

अजून बातम्या वाचा..

बुरुकुलवाडी सबस्टेशन जवळ अस्तगाव रोडवरील पांझन नदी पुलाजवळ सुरक्षा कठडे लावावेत – संजय दराडे

बुरुकुलवाडी सबस्टेशन जवळ अस्तगाव रोडवरील पांझन नदी पुलाजवळ सुरक्षा कठडे लावावेत – संजय दराडे

  मनमाड – स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या अस्तगाव...

read more
आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आनंदी सांगळे प्रवीण व्यवहारे तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी निवड

आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आनंदी सांगळे प्रवीण व्यवहारे तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी निवड

राजगिर बिहार येथे ११ ते १५ मे २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ७ व्या खेलो इंडिया यूथ गेम्स...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]