Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

आमदार कांदे यांच्या हस्ते विवेकानंद व्याख्यानमालेचे उद्घाटन ! सकारात्मक विचार हाच जीवनाचा खरा “मंत्र” – घळसासी

Jan 11, 2022

मनमाड : गेल्या 25 वर्षांपासून मनमाड शहरातील नागरिक आणि रसिक श्रोत्यांना ज्ञानाची शिदोरी देणाऱ्या संस्कृती संवर्धन समिती आयोजित स्वामी विवेकानंद व्याख्यान मालेचे नांदगाव तालुक्याचे आमदार श्री सुहास कांदे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.

दि 10 ते 12 जानेवारी दरम्यान शहरातील मान्यवर आणि नामवंत वक्ते यांच्या उपस्थितीत व्याख्यानमाला संपन्न होणार असुन , आज पहिल्या दिवसाचे पुष्प हे श्री विवेक घळसासी यांनी गुंफले. यंदाच्या वर्षी संस्कृती संवर्धन समितीच्या गेल्या 25 वर्षांच्या कार्याचा आढावा म्हणुन कार्यक्रमाच्या ठिकाणी समितीचे गेल्या 25 वर्षांच्या झालेल्या व्याख्यानाच्या छायाचित्राचे प्रदर्शनही लावण्यात आले आहे. आजच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन आमदार श्री सुहास कांदे , मुख्याधिकारी श्री विजयकुमार मुंडे , डॉ.श्री संजय पाटील , पोलिस निरीक्षक श्री गीते साहेब , श्री मयुर बोरसे आजच्या व्याख्यानाचे प्रायोजक श्री स्वप्नील सांगळे आदी उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांचा संस्कृती संवर्धन बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष श्री प्रविण व्यवहारे आणि संस्कृती संवर्धन समितीचे अध्यक्ष श्री योगेश म्हस्के यांच्या हस्ते स्वागत आणि सत्कार करण्यात आला.

श्री विवेक घळसासी यांनी आपले विचार मंडतांना संगीतले की , जीवन जगताना नेहेमी सकारात्मक विचारांनी जगले पाहिजे , आज समाजातील अनेक कुटुंबावर दूरचित्रवाणीवर प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमाचापगडा असुन त्या कार्यक्रमातील आभासी कथांना सत्य मानून त्यांचा परिणाम हा आपल्या रोजच्या जीवनावर होत आहे.सकारात्मक विचार घेऊन जीवनतील प्रत्येक संकटांचा सामना करणे सोपे जात असते. रोजच्या जगण्यातील अनेक सोपी उदाहरणे देऊन त्यांनी आपले विचार मांडले.सर्व शासकीय नियमांचे पालन करून , प्रत्यक्ष उपस्थित मर्यादीत संख्येने आणि ऑनलाईन स्वरूपातील श्रोत्यांच्या उपस्थितीत आजचे व्याख्यान संपन्न झाले. आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्रमोद मुळे , परिचय श्री सिद्धांत लोढा आणि आभार श्री आनंद काकडे यांनी मानले.

अजून बातम्या वाचा..

१ जुलै पासून केंद्राने लागु केलेल्या कायद्याची पोलिस स्टेशनला अमलबजावणी गुन्हेगारांना बसणार जरब

१ जुलै पासून केंद्राने लागु केलेल्या कायद्याची पोलिस स्टेशनला अमलबजावणी गुन्हेगारांना बसणार जरब

  नांदगांव : मारुती जगधने इंग्रज काळातील कायद्यात केंद्र शासनाने बदल केला असून गत ७५ वर्षाहुन...

read more
राज्यात ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करणार  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा

राज्यात ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा

मुंबई, दि. २९: राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन घडविण्यासाठी मुख्यमंत्री...

read more
मिशन विधानसभा – मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अर्थमंत्री अजित पवारांकडून घोषणा

मिशन विधानसभा – मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अर्थमंत्री अजित पवारांकडून घोषणा

मुंबई, 28 जून : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी राज्याचे अर्थमंत्री...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]