Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

वातावरणातील बदलामुळे नागरिकांनी घ्यावी आरोग्याची काळजी – डॉ. जी. एस. नरवणे

Jan 11, 2022

वातावरणात होत असलेल्या बदलांमुळे मनमाडमधील नागरिकांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होत आहे. एकीकडे डेंगी, मलेरिया, गॅस्ट्रोच्या रुग्णांची संख्या वाढत असताना आता वातावरणात गारवा वाढल्याने सर्दी, खोकला, घसा खवखव, तापाच्या रुग्णांचीही संख्या वाढली आहे. उपजिल्हा रुग्णालयात बाह्यरुग्ण विभागातील (ओपीडी) वाढत्या रुग्णांचे प्रमाण पाहता नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ जी एस नरवणे यांनी सांगितले.

गेल्या काही दिवसांपासून वातावरणात झालेल्या बदलामुळे संसर्गजन्य आजाराच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. सर्दी, खोकला, घशात खवखव आणि ताप जाणवत आहे. नाकातून पाणी येणे, घसा खवखवणे, डोकेदुखी, श्वसनाच्या त्रासामुळे अनेक जण रुग्णालयात जातांना दिसत आहेत. याशिवाय लहान मुलांमध्ये सर्दी, खोकल्याचे विकार बळावत असून नागरिकांनी  घाबरून न जाण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे  मात्र ताप जास्त असल्यास त्वरित कोविड तपासणी करून उपचार घ्यावेत असेही सूचविण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत  आहे. अवकाळी पाऊस, तापमानातील घसरणीमुळे सर्दी, खोकला, घशातील खवखव आणि तापाची साथ पसरली आहे. सध्याच्या कोरोना संसर्गाची लक्षणेही सारखीच आहेत. त्यामुळे अनेक नागरिकांमध्ये संभ्रम आहे. उपजिल्हा रुग्णालयांसह खासगी रुग्णालयात रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. उपजिल्हा रुग्णालयात दररोजच्या बाह्यरुग्ण तपासणी विभागात रुग्णांची गर्दी वाढत असून ओपीडीत ४०० हून अधिक रुग्ण दाखल होत आहेत. ताप, सर्दी, खोकला असलेल्या रुग्णांची संख्या आठवडाभरापासून वाढतच आहे. खासगी क्लिनिकमध्येही रुग्ण गर्दी करत आहेत. त्यामुळे शहरातील सामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या आरोग्यसेवेवर ताण पडत आहे. त्याचा फटका मात्र गरीब रुग्णांना सहन करावा लागत आहे.  सकाळच्या वेळात रुग्णांची संख्या अधिक असल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण पडतो. त्यामुळे काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांकडून केले जात आहे. नागरिकांनी काळजी घेतांना उकळलेले पाणीच प्यावे, बाहेरील पदार्थ न खाता ताजे घरगुती अन्न खावे, घरात हवा खेळती राहील याची काळजी घ्यवी. दररोज जेवण करण्यापूर्वी हात स्वच्छ धुवावे. डिसेंबर, जानेवारी महिन्यात मनमाडमध्ये सर्दी, ताप आणि खोकल्याचे रुग्ण वाढतात. हिवाळ्यात वातावरण बदलामुळे स्वाईन फ्ल्यू, न्यूमोनिया असे आजार मुलांमध्ये जास्त पाहायला मिळतात. त्यामुळे पालकांनी मुलांच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे डॉक्टरांनी सांगितले

अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयात शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन

मनमाड महाविद्यालयात शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन

मनमाड: महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे महात्मा...

read more
नांदगाव तालुका दुष्काळी जाहीर व्हावा न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजितदादा पवार गट) वतीने उपोषणाचा इशारा…

नांदगाव तालुका दुष्काळी जाहीर व्हावा न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजितदादा पवार गट) वतीने उपोषणाचा इशारा…

आज दि. ०४ नोव्हेंबर २०२३नांदगांव तालुक्यामध्ये या वर्षी सर्वात कमी पर्जन्यमान झालेले आहेत जून...

read more
नाशिक जिल्ह्याचा दुष्काळ ग्रस्त यादीत  समावेश करावा – डॅा. भारती पवार, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची मुंबईत भेट घेवुन केली मागणी

नाशिक जिल्ह्याचा दुष्काळ ग्रस्त यादीत समावेश करावा – डॅा. भारती पवार, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची मुंबईत भेट घेवुन केली मागणी

मुंबई: राज्यात जून ते सप्टेंबरदरम्यान पावसाने फिरविलेली पाठ, त्यामुळे भूजलाची कमतरता, पेरणीखालील...

read more
बघा व्हिडिओ – प्रशासनाने नांदगाव तालुका त्वरित दुष्काळी जाहीर करावा – उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची मागणी

बघा व्हिडिओ – प्रशासनाने नांदगाव तालुका त्वरित दुष्काळी जाहीर करावा – उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची मागणी

मनमाड - नाशिक जिल्ह्यात यंदा पावसाने दडी मारल्याने दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागत असून...

read more
नांदगाव येथील रेल्वे अभियंता आणि कर्मचाऱ्याची समय सूचकता – प्रसंगावधान राखत होणारा रेल्वे अपघात,वित्तहानी आणि जीवितहानी पासून रक्षण

नांदगाव येथील रेल्वे अभियंता आणि कर्मचाऱ्याची समय सूचकता – प्रसंगावधान राखत होणारा रेल्वे अपघात,वित्तहानी आणि जीवितहानी पासून रक्षण

मनमाड - नांदगाव डेपो मधील हेल्पर खलाशी या पदावर नियुक्त असलेले कर्मचारी दगडू शेषराव आहेर हे...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]