Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

डॉ. नरेश गिते महावितरण कंपनीचे संचालक (मानव संसाधन) पदी रुजू

Jan 13, 2022

महावितरण कंपनीचे संचालक (मानव संसाधन) म्हणून डॉ. नरेश गिते यांनी गुरुवारी (दि. १३) कार्यभार स्वीकारला. त्यांची या पदावर थेट भरती प्रक्रियेतून निवड झाली आहे. याआधी ते महावितरणमध्ये औरंगाबाद प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक म्हणून सेवानिवृत्त झाले होते.

राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये ३८ वर्षांचा प्रशासकीय सेवेचा प्रदीर्घ अनुभव असलेले डॉ. नरेश गिते यांनी १९८३ मध्ये जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून प्रशासकीय सेवेला प्रारंभ केला. त्यानंतर सन २००९ मध्ये भारतीय प्रशासकीय सेवामध्ये (आयएएस) डॉ. गिते यांची निवड झाली. त्यानंतर नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मिरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त, राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे सहसचिव, महानंद डेअरीचे व्यवस्थापकीय संचालक आदी पदांवर डॉ. गिते यांनी काम केले आहे.

तसेच महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक म्हणून डॉ. नरेश गिते यांनी सुमारे नऊ महिन्यांच्या कालावधीत प्रामुख्याने ग्राहकसेवा, सुरळीत वीजपुरवठा तसेच थेट गावात जाऊन वीजप्रश्न सोडविण्यावर भर दिला. राज्य शासनाच्या कृषिपंप वीजजोडणी धोरण २०२०च्या अंमलबजावणीची विशेष जबाबदारी महावितरणच्या व्यवस्थापनाकडून डॉ. गिते यांच्याकडे देण्यात आली होती. यामध्ये ४५ दिवसांच्या ‘कृषी ऊर्जा पर्वा’च्या माध्यमातून ही योजना गावोगावी पोहोचविण्यात त्यांनी योगदान दिले. गेल्या वर्षी मे महिन्यात ते सेवानिवृत्त झाले होते. त्यानंतर महावितरणच्या संचालक (मानव संसाधन) पदी थेट भरती प्रक्रियेतून डॉ. गिते यांची नुकतीच निवड झाली.

राज्यातील 2 कोटी ८० लाख वीजग्राहकांना सेवा देणाऱ्या महावितरणचे अंतर्गत मानव संसाधनाचे प्रशासकीय कामकाज आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आणखी वेगवान तसेच तत्पर व सकारात्मक करण्यास प्राधान्य देण्यात येईल असे डॉ. नरेश गिते यांनी सांगितले.

अजून बातम्या वाचा..

आंतरराष्ट्रीय गुणवत्ता मानके आणि अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल्समध्ये रुग्णाची संपूर्ण सुरक्षा

आंतरराष्ट्रीय गुणवत्ता मानके आणि अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल्समध्ये रुग्णाची संपूर्ण सुरक्षा

अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल कार्यक्षम सेवाप्रदान करण्यासाठी लोक-केंद्रित दृष्टीकोन स्वीकारतो....

read more
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा  पुतळा अ.भा. मराठा महासंघ नांदगावच्या वतीने स्वखर्चाने उभारण्याचा निर्णय

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा अ.भा. मराठा महासंघ नांदगावच्या वतीने स्वखर्चाने उभारण्याचा निर्णय

मावळ प्रांताची साम्राज्ञी लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या येणाऱ्या 31 मे 2022 जयंती...

read more
आज औरंगाबाद मध्ये काय होणार राज गर्जना ? राज ठाकरे आणि भाजपचे टार्गेट एकच शिवसेना

आज औरंगाबाद मध्ये काय होणार राज गर्जना ? राज ठाकरे आणि भाजपचे टार्गेट एकच शिवसेना

मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालीसा पठण ह्या मुद्द्यावरून राज्यातले राजकीय वातावरण चांगलेच तापलेले...

read more
मनमाड शहर संविधान प्रेमी नागरिकां तर्फे राज ठाकरे यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची निवेदन द्वारे मांगणी !

मनमाड शहर संविधान प्रेमी नागरिकां तर्फे राज ठाकरे यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची निवेदन द्वारे मांगणी !

मनमाड:- काही दिवसांपूर्वी गुढीपाडव्याच्या सभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]