मनमाड शहरातून प्रसिध्द होणार्या दै जनश्रद्धा या वृत्तपत्रातर्फे संस्थापक संपादक जेष्ठ पत्रकार कै. कांतीलाल गुजराथी व जेष्ठ पत्रकार कै शकुंतला गुजराथी यांच्या स्मरणार्थ व नांदगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या विद्यमाने उत्कृष्ट बातमी लेखन पुरस्कार जाहीर झाले आहेत. नांदगाव तालुकास्तरावर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते . स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ दि. १५ जानेवारी रोजी मनमाड येथे होणार असल्याची माहिती आयोजक जेष्ठ पत्रकार नरेश गुजराथी, व कार्यकारी संपादक सतिष शेकदार यांनी दिली.
जाहीर करण्यात आलेले पुरस्कार पुढील प्रमाणे
उत्कृष्ट बातमी लेखन पुरस्कार प्रथम अमोल खरे, मनमाड दै सकाळ – ना अंगभर कपडे, ना खायला अन्न … बालपणातच भिकेची वेळ, द्वितीय शशिकांत पाटील – न्यायडोंगरी – दै ऍग्रोवन – कापूस उत्पादक खानदेशला टेक्स्टाईल पार्कची प्रतीक्षा तृतीय नरहरी उंबरे – मनमाड – दै पुण्यनगरी – सोशल हाकमुळे यशवंतला मिळाली त्याची आई,
सामाजिक बातमी लेखन पुरस्कार –
१) मारुती जगधने – नांदगाव – दै पुढारी – सर्वेक्षणाची मोहीम करतेय कोरोनाची जोखीम दूर २) संजय मोरे – नांदगाव – दै देशदूत – ऊस तोडीसाठी मजुरांचे स्थलांतर ३) सोमनाथ घोंगाने – नांदगाव – दै दिनकर – नांदगावकरांचे समस्याबाबतचे आंदोलन
समस्याप्रधान बातमी लेखन पुरस्कार १) धनंजय देशमुख – पिंपरखेड – दै पुढारी – स्वप्नांच्या पाठलागासाठी मजुरांचा थंडी वाऱ्याशी संघर्ष २) अनिल आव्हाड – नांदगाव – दै लोकनामा – जेंव्हा राजकिय नेत्यावर येते भाजीपाला विकण्याची वेळ ३) निलेश व्यवहारे – मनमाड – सतर्क पोलीस टाइम्स – भाऊ बीजेच्या दिवशीच भावाची हत्या,
उल्लेखनीय साप्ताहिक बातमी लेखन पुरस्कार१) उपाली परदेशी – मनमाड – पत्रीसरकार २) रोहित शेळके – नांदगाव – शांकबरीच्या तिरावरून ३) सॅमसन आव्हाड – मनमाड – लोक वजीर,
ह्युमन स्टोरी बातमी लेखन पुरस्कार
१) संदीप देशपांडे – मनमाड – दै महाराष्ट्र टाईम्स – पाणी लागे पर्यंत तुमची विहीर खोदून देऊ २) प्रमित आहेर – नांदगाव – दै दिव्य मराठी – तीन चिमुकल्या लेकींसोबत आई जागेवरच गतप्राण ३) अशोक बिदरी – मनमाड – लोकमत – तृतीयपंथीयांशी लग्न गाठींमुळे दाम्पत्य बनले सेलिब्रिटी,
उत्कृष्ट पोर्टल बातमी लेखन पुरस्कार १) तुषार गोयल – मनमाड – मनमाड ठिणगी २) नाना आहिरे – साकोरा – आवाज एन न्यूज ३) आंनद बोथरा – मनमाड – मनमाड ठिणगी ४) प्रज्ञानंद जाधव – नांदगाव – नाशिक न्यूज ५) अफरोज शेख – मनमाड – जन आवाज न्यूज ६) सुरेश नारायने – नांदगाव – गणतंत्र न्यूज
उत्कृष्ट फोटोग्राफी पुरस्कार- योगेश म्हस्के – मनमाड – दै दिव्य मराठी – गुरुनानक जयंतीनिमित्त गुरुद्वारावर आकर्षक रोषणाई फटाक्यांची आतषबाजी
न्यूज चैनल
उत्कृष्ट वृत्तांकन पुरस्कार१) निलेश वाघ – मनमाड – झी २४ तास २) अजय सोनवणे – मनमाड – एबीपी माझा ३) संदीप जेजुरकर – नांदगाव – लोकशाही न्युज






