Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

गुप्तसर साहेब गुरुद्वारा मनमाड येथे लोहड़ी (लोहरी) उत्सव साजरा….

Jan 14, 2022

गुप्तसर साहेब गुरूद्वारा मनमाड येथे लोहड़ी उत्सव मकर संक्रांतीच्या एक दिवस अगोदर 13 जानेवारीला रात्री शहरातील शिख बंधवांच्या उपस्थितित आनंदात साजरा करण्यात आला.

लोहड़ी हा पंजाब प्रांतात साजरा होणारा हिवाळ्यातील सुगीचा उत्सव आहे.उत्तर हिंदुस्थानातील शीख आणि हिंदू नागरिक हा उत्सव साजरा करतात. जानेवारी रोजी हा उत्सव साजरा केला जातो.या उत्सवाशी संबंधित कथा आणि आख्यायिका पंजाब प्रांतात प्रचलित आहेत.लोहारी हा सूर्याच्या उत्तरायण संक्रमणाशी माघ महिन्यात येणारा उत्सव आहे. हिवाळा ऋतूला निरोप देणे असा या उत्सवाचा हेतू असतो.सामान्यत: मकरसंक्रांत सणाच्या आदल्या दिवशी लोहारी साजरा केला जातो.उत्तर भारतातील दिल्ली , पंजाब, हरियाणा या प्रांतात या दिवशी विशेष सुट्टी दिली जाते.

अग्नीपूजा हा या उत्सवातील महत्वाचे वैशिष्ट्य मानले जाते. हिवाळा ऋतू असल्याने शेकोटी पेटविणे याला पारंपरिक महत्व मिळाले आहे.गूळ,गजक, उसाचा रस यांचा समावेश या दिवशी खाण्यात आवर्जून समावेश केला जातो.गावाच्या मध्यभागी सूर्यास्ताला संध्याकाळी शेकोटी पेटविली जाते. लोक त्यामध्ये तीळ, गूळ वाहतात. त्याभोवती बसून लोकगीते गातात आणि पारंपरिक नृत्य करतात. शेतातील ताजी मक्याची कणसे भाजून खाणे हा एक विशेष कार्यक्रम असतो. शेतात आलेला लाल मुळा हा सुद्धा या दिवशी जेवणात समाविष्ट केला जातो. मोहरीच्या पानांची भाजी, मक्याची पोळी, किंवा भाकरी ही या उत्सवाची महत्वाची मेजवानी असते. तीळ घालून केलेला भात या दिवशी जेवणात समाविष्ट असतो. याला त्रिचोली म्हटले जाते.पंजाब च्या काही प्रांतात लोहारी या देवतेची स्थापना केली जाते. गायीच्या शेणापासून ही मूर्ती तयार करून तिची सजावट केली जाते.लोहारी निमित्त सजलेली पंजाबी महिलासुगीच्या काळातील हाती येणा-या शेतातील पिकाचा आनंद साजरा करणे असे या सणाचे महत्व आहे.सूर्याचे उत्तरायण सुरु होवून दिवस मोठा होत असल्याने सूर्याची पूजा आणि स्तुती ही सुद्धा या उत्सवात केली जाते. दुल्ला भट्टी हा पंजाब प्रांतात एक प्रसिद्ध व्यक्ती म्हणून ओळखला जातो. अकबराच्या काळात हिंदू युवतीना पळवून नेले जात असे. त्या मुलींचे रक्षण करणारा म्हणून दुल्ला भट्टी विशेष प्रसिद्ध आहे आणि त्याला समाजात मानाचे स्थान आहे.त्याने वाचविलेल्या सुंदरी आणि मुन्दरी या दोन युवती पंजाबी लोककथांमधे अजरामर झाल्या आहेत. या उत्सवाच्या निमित्ताने लहान मुले आसपास जाऊन लोकगीते म्हणतात त्यात याच्या नावाचा उल्लेख येतो. या लोकगीत गायनाच्या कार्यक्रमानंतर घरोघरी लहान मुलांना खाऊ आणि पैसे दिले जातात.

संत कबीर यांच्या पत्नी लोई यांच्या निमित्ताने हा उत्सव सुरु झाला अशीही एक मान्यता आहे लोई म्हणजे अग्नीतील तेज आणि उर्जा होय. होलिका आणि लोई या दोघी बहिणी असल्याचे काही ठिकाणी मानले जाते. सिंधी समुदायात लोई या नावाने हा सण साजरा केला जातो.

या कार्यक्रमास शहरातील सर्व शिख बांधव , मनमाड गुप्तसर गुरूद्वारचे प्रबंधक बाबा रणजीत सिंह जी , शहरातील आणि बाहेर गावाहुन आलेले भाविक उपस्थित होते , कार्यक्रमा नंतर बाबाजींच्या हस्ते सर्वांना प्रसाद देण्यात आला.

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ – राज्यपाल कोश्यारींच्या वादग्रस्त वक्तव्याचा मनमाड मध्ये जाहीर निषेध

बघा व्हिडिओ – राज्यपाल कोश्यारींच्या वादग्रस्त वक्तव्याचा मनमाड मध्ये जाहीर निषेध

मनमाड - छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श आहेत आधुनिक युगातील नितीन गडकरी हे आदर्श...

read more
बघा व्हिडिओ – श्रद्धा वालकर हत्याकांडाचा मनमाड शहर शिवसेना तसेच मनमाडकरांकडून जळजळीत निषेध

बघा व्हिडिओ – श्रद्धा वालकर हत्याकांडाचा मनमाड शहर शिवसेना तसेच मनमाडकरांकडून जळजळीत निषेध

मनमाड शहर शिवसेना तर्फे करण्यात आलेल्या आवाहनास प्रतिसाद देत मोठ्या संख्येने मनमाडकर नागरिक महिला...

read more
लोककलावंतांचे विविध रखडलेले प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्र सांस्कृतिक कला बैठक हुतात्मा स्मारक नाशिक येथे संपन्

लोककलावंतांचे विविध रखडलेले प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्र सांस्कृतिक कला बैठक हुतात्मा स्मारक नाशिक येथे संपन्

नाशिक (प्रतिनिधी) महाराष्ट्रातील तमाम शोषित, उपेक्षित व वंचित लोककलावंतांचे प्रश्न...

read more
आफताब पूनावालाला फाशी देण्याची मागणी, राज्यपालांच्या वक्तव्याचा  युवा सेनेने केला निषेध

आफताब पूनावालाला फाशी देण्याची मागणी, राज्यपालांच्या वक्तव्याचा युवा सेनेने केला निषेध

आफताब पुनावाला वर कारवाईची मागणी व महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी...

read more
श्रद्धा वालकर हत्येची केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावी ; आफताब पुणवाला ला मरेपर्यंत फाशीची मनमाड मनसे ची मागणी

श्रद्धा वालकर हत्येची केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावी ; आफताब पुणवाला ला मरेपर्यंत फाशीची मनमाड मनसे ची मागणी

महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनमाड शहर शाखेच्या वतीने येथील मनमाड शहर पोलिस स्थानकात श्रद्धा वारकर...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]