Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

Jan 14, 2022

येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथील महाविद्यालयात प्राचार्य डॉ.ए.व्ही पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले .
प्रारंभी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.पी.जी.आंबेकर यांनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेतील राजमाता जिजाऊंचे आणि भारतीय संस्कृतीचे जगाला परिचय करून देणार्‍या स्वामी विवेकानंदांचे योगदान याविषयीची माहिती देऊन उत्सव व जयंती का साजरी करायची त्यामागचा दृष्टिकोन काय आहे यासंदर्भात उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास कनिष्ठ विभागाच्या उपप्राचार्या श्रीमती ज्योती पालवे वरिष्ठ पर्यवेक्षक डॉ.सतीश तांबे कनिष्ठ पर्यवेक्षक प्रा. विठ्ठल फंड,प्राध्यापक वृंद, कार्यालयीन कुलसचिव समाधान केदारे , कार्यालयीन कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते . कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने करण्यात आले होते . कार्यक्रमाप्रसंगी कोरोना नियमांचे पालन करण्यात आले

अजून बातम्या वाचा..

शिधापत्रिका (रेशनकार्ड ) धारकांनी ई. के . वाय. सी करून घ्यावी –  तहसिलदार डॉ. सिद्वार्थ मोरे

शिधापत्रिका (रेशनकार्ड ) धारकांनी ई. के . वाय. सी करून घ्यावी – तहसिलदार डॉ. सिद्वार्थ मोरे

नांदगाव सोमनाथ घोंगाणे नांदगाव तालुक्यातील शिधापत्रिका (रेशनकार्ड ) धारकांनी आपल्या रेशनकार्ड मधील...

read more
पोषण माह २०२२ अंतर्गत अंगणवाडीत पौष्टीक पाककृतीचे आयोजन , या नाविन्यपुर्ण उपक्रमात  महिलांनी नोंदविला सहभाग-शितल गायकवाड एबाविसेयो प्रकल्प नागरी नाशिक -२

पोषण माह २०२२ अंतर्गत अंगणवाडीत पौष्टीक पाककृतीचे आयोजन , या नाविन्यपुर्ण उपक्रमात महिलांनी नोंदविला सहभाग-शितल गायकवाड एबाविसेयो प्रकल्प नागरी नाशिक -२

पोषण महा २०२२ अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प नागरी नाशिक -२अंगणवाडी क्र.६८....

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]