Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड शहर भाजपाची संघटनात्मक बैठक संपन्न !

Jan 18, 2022

नजीकच्या काळात होणाऱ्या मनमाड नगरपालिका पंचवार्षिक निवडणूक संदर्भात मनमाड शहर भाजपा मंडलची बैठक संपन्न झाली. मंचावर मनमाड नगरपालिका निवडणूक प्रभारी बापूसाहेब पाटील, जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष सचिन दराडे, मनमाड मंडल अध्यक्ष जयकुमार फुलवाणी, व्यापारी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष सचिन संघवी, आर्थिक सेल जिल्हाध्यक्ष कांतीलाल लुणावत, शहर संघटन सरचिटणीस नितीन परदेशी आदि उपस्थित होते.

नितीन पांडे यांनी बैठकीचे प्रास्ताविक मध्ये मनमाड भाजपा पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी शक्ती केंद्र रचना व बूथ रचना मजबूत करावी आणि भाजपा महाराष्ट्र प्रदेश कडून आलेले सर्व कार्यक्रम ताकदीने राबवावे असे आवाहन केले तर मनमाड प्रभारी बापूसाहेब पाटील यांनी सर्व प्रथम नगरपालिका निवडणूक तयारी संदर्भात मनमाड शहरातील 11 शक्तिकेंद्र व 58 बूथ यांचा संघटनात्मक आढावा घेत आगामी काळात शक्ती केंद्र प्रमुख व बूथ प्रमुख यांनी प्रत्येक बूथ वर संपर्क साठी सोशल मीडिया ग्रुप तयार करावा आणि नमो अँप च्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वाखाली कार्य करणाऱ्या केद्र सरकारच्या विविध योजना प्रत्येक बूथ वरील नागरिकांनपर्यत पोहवाव्यात, महिन्याच्या शेवटच्या रविवारी संपन्न होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राष्ट्रला असणारे संबोधन “मन की बात” हा कार्यक्रम प्रत्येक बूथ वर आयोजित करावा, सुदृढ बालक स्पर्धेचे आयोजन करावे असे आवाहन केले.

याच बैठकीत शहराध्यक्ष जयकुमार फुलवाणी यांनी मयूर नंदकिशोर माळी आणि सुमेर मिसर यांची शहर चिटणीस म्हणून तर अल्पसंख्याक मोर्चाचे शहराध्यक्ष जलील अन्सारी यांनी अल्पसंख्याक मोर्चा शहर सरचिटणीसपदी अकिल शेख यांची नियुक्ती जाहीर केली. मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ह्या नवं नियुक्त पदाधिकाऱ्यांन नियुक्ती पत्र देऊन त्याचा सत्कार करण्यात आला.

बैठकीस जेष्ठ कार्यकर्ते निळकंठ त्रिभुवन, शहर सरचिटणीस एकनाथ बोडखे, भटक्या विमुक्त आघाडीचे जिल्हा सरचिटणीस अकबर शहा, शहर उपाध्यक्ष बुधणबाबा शेख, धीरज भाबड, शहर चिटणीस नारायण जगताप, मकरंद कुलकर्णी, शहर कोषाध्यक्ष आनंद काकडे, अल्पसंख्याक मोर्चा जैन प्रकोष्ठचे शहराध्यक्ष आनंद बोथरा, व्यापारी आघाडीचे शहराध्यक्ष अमित गोगड, दिव्यांग आघाडीचे शहराध्यक्ष दिपक पगारे, ओबीसी मोर्चा जिल्हा चिटणीस गौरव ढोले, ओबीसी मोर्चाचे शहराध्यक्ष गोविंद सानप, ट्रान्सपोर्ट आघाडीचे शहराध्यक्ष संजय चोपडा, सहकार आघाडीचे किरण उगलमुगले, अनुसूचित जाती मोर्चाचे आशिष चावरीया, सूरज कल्याणी, मोहम्मद अली, अनंता भामरे, राज परदेशी, सचिन छाजेड, शिक्षक आघाडीचे शहराध्यक्ष द्वारकानाथ झाम्बरे, महिला मोर्चाच्या नाजमा अन्सारी, महेरूनिसा शेख, फातमा मलबारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बैठकीचे संयोजन मनमाड शहराध्यक्ष जयकुमार फुलवाणी यांनी केले तर सूत्रसंचालन शहर संघटन सरचिटणीस नितीन परदेशी यांनी केले. जलील अन्सारी यांनी आभार प्रदर्शन केले.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव तालुक्याची पिक आणेवारी चुकीची राष्ट्रवादी कॉग्रेस ( शरद पवार ) गटाचे तहसिलदार यांना निवेदन

नांदगाव तालुक्याची पिक आणेवारी चुकीची
राष्ट्रवादी कॉग्रेस ( शरद पवार ) गटाचे तहसिलदार यांना निवेदन

नांदगाव सोमनाथ थोगांणेनांदगाव तालुक्यातील परिस्थिती बघता काही तुरळक अपवाद वगळता अनेक ठिकाणी...

read more
श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट संचलित, श्री निलमणी गणेश मंडळ मनमाड. लोकमान्य  टिळकांना अभिप्रेत असणाऱ्या आदर्श सार्वजनिक गणेशोत्सवा चे यंदा 27 वे वर्ष

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट संचलित, श्री निलमणी गणेश मंडळ मनमाड. लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असणाऱ्या आदर्श सार्वजनिक गणेशोत्सवा चे यंदा 27 वे वर्ष

हिंदू संस्कृतीचे जतन व्हावे, समाजात जनजागृती होवून समाज संघटीत व्हावा, राष्ट्रभक्तीची भावना वाढीस...

read more
तालुक्यावर दुष्काळाचे सावट – शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश धात्रक यांचे वाढदिवस साजरा न करण्याचे आवाहन

तालुक्यावर दुष्काळाचे सावट – शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश धात्रक यांचे वाढदिवस साजरा न करण्याचे आवाहन

नांदगाव विधानसभा मतदारसंघातील बंधु-भगिनी, ग्रामस्थ, हितचिंतक, स्नेहीजन, मित्रपरिवार तसेच शिवसेना...

read more
भाद्रपद महागणेशोत्सव 2023 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात श्रीसत्य विनायक महापूजा व सलग नवव्या वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) कार्यक्रमाचे आयोजन

भाद्रपद महागणेशोत्सव 2023 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात श्रीसत्य विनायक महापूजा व सलग नवव्या वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड - आम्ही परंपरा पाळतो... ❗ आम्ही संस्कृती चे रक्षण करतो.... ❗ हे ब्रीद घेऊन मनमाड शहरात...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]