loader image

तालुक्यावर दुष्काळाचे सावट – शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश धात्रक यांचे वाढदिवस साजरा न करण्याचे आवाहन

Sep 23, 2023


नांदगाव विधानसभा मतदारसंघातील बंधु-भगिनी, ग्रामस्थ, हितचिंतक, स्नेहीजन, मित्रपरिवार तसेच शिवसेना उध्दव बाळासाहेब पक्षाचे सर्व सहकारी पदाधिकारी, नगरसेवक, युवा शिवसैनिक, महिला आघाडी व शिवसेनेच्या सर्व अंगीकृत संस्था संघटना व सर्व राजकीय, सामाजिक, धार्मिक, क्रीडा, शैक्षणिक संस्थेतील व कामगार क्षेत्रातील हितचिंतक व बांधवांना विनंतीपूर्वक आवाहन करतो की, रविवार दि.२४/०९/२०२३ रोजी माझा वाढदिवस आहे. परंतु राज्यात व नांदगाव मतदारसंघात सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु आहे मात्र, महाराष्ट्रातील बहुसंख्य ठिकाणी समाधानकारक पावसा अभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने नांदगाव तालुक्यातील व मनमाड शहरातील माता भगिनींना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. तसेच नांदगाव मतदारसंघातील बळीराजा पावसाच्या प्रतिक्षेत चिंताग्रस्त झाला आहे. तालुक्यावर दुष्काळाचे सावट असल्याने मी माझा वाढविस साजरा करणार नाही, तरी माझ्या नांदगाव मतदारसंघातील सर्व हितचिंतक व माझ्यावर भरभरुन प्रेम करणारे कायम माझ्या पाठीशी उभे राहणारे, मला आशिर्वाद देणारे व कायम माझ्या यशासाठी प्रार्थना करणारे जेष्ठ शिवसैनिक, नागरिक, माता भगिनी यांनी माझा वाढदिवस साजरा न करता, कुठेही बॅनर, केक, जाहिरात, प्रत्यक्ष भेटून हार, फूल, शाल न देता माझ्या नांदगाव मतदारसंघातील बळीराजावरील दुष्काळाचे सावट दुर होवो, गुराढोरांना चाऱ्याची व्यवस्था होवो, माझ्या माता भगिनींची पाण्यासाठी होणारी वणवण कमी व्हावी यासाठी श्रीकृष्ण प्रभूचरणी, गणपती बाप्पाच्या चरणी तसेच सर्वधर्मीय बांधवांनी आपापल्या इष्टदेवतेची प्रार्थना करावी हीच माझ्यासाठी वाढदिवसाची सुंदर शुभेच्छा ठरेल आणि असेच आशिर्वाद कायम माझ्या पाठीशी राहु द्या हीच नम्र विनंती असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख गणेश धात्रक यांनी केले आहे.


अजून बातम्या वाचा..

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...

read more
.