महात्मा गांधी विद्यामंदीर संचलित
कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड,
शैक्षणिक वर्ष २०२१-२२ दरम्यान नाशिक जिल्हा विभागीय क्रीडा समिती यांच्या मार्फत फुटबॉल या क्रीडा स्पर्धांचे आयोजन पंचवटी महाविद्यालय मार्फत करण्यात आले होते.सदर फुटबॉल आंतर महाविद्यालयीन स्पर्धेसाठी संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला होता. उपरोक्त स्पर्धेसाठी कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाडच्या १६ विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला होता.यात महाविद्यालयाच्या खेळाडूंच्या उत्कृष्ठ खेळाच्या जोरावर सलग चार सामने जिंकून अंतिम सामन्यात प्रवेश मिळविला होता व स्पर्धेचे संयुक्त विजेतेपद पंचवटी महाविद्यालयाच्या सोबत विभागून आनंद साजरा केला.सदर स्पर्धेत महाविद्यालयाच्या चार खेळाडूंची कु. प्रणीत दिवान , कु.मोहम्मद अन्सारी ,कु तुषार देसाई आणि कु.सनी सिमोन या खेळाडूंची निवड लोणावळा पुणे येथे होणाऱ्या आंतरविभागीय फुटबॉल क्रीडा स्पर्धेस झाली होती. सदर स्पर्धेत कु.प्रणीत दिवान कु,मोहम्मद अन्सारी सुवर्ण कामगिरी करत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संघात आपले नाव निश्चित केले.सदर पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ स्पर्धा जयपूर राजस्थान येथे पार पडल्या होत्या.या स्पर्धेत आपल्या विद्यापीठाच्या संघाने उत्कृष्ठ कामगिरी करत अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेस आपले नाव निश्चित केले.सदर स्पर्धेत निवड झालेल्या खेळाडू महात्मा गांधी विद्यापीठ कोट्याम येथे दिनांक १२/०१/२२ ते १६/०१/२२ पार पडणाऱ्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेस आपला सहभाग नोंदविणार आहे.
महाविद्यालयातील या विद्यार्थ्याने यश संपादन केल्याबद्दल संस्थेचे सरचिटणीस समाजश्री डॉ.प्रशांत दादा हिरे संस्थेचे समन्वयक डॉ.अपूर्वभाऊ हिरे संस्थेच्या कोषाध्यक्षा श्रीमती स्मिताताई हिरे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए.व्ही. पाटील उपप्राचार्य डॉ.पी.जी.आंबेकर,कुलसचिव समाधान केदारे, तसेच महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ दिनेश कराड व महेंद्र वानखेडे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

“मनमाड महाविद्यालयात रोजगार मेळावा – विद्यार्थ्यांना करिअरच्या नव्या संधी”
मंगळवार, दिनांक ०७ ऑक्टोबर २०२५ रोजी महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित कला, विज्ञान आणि...