loader image
[ays_poll id=7]

कृषीमंत्री दादा भुसे यांचे खतांच्या वाढलेल्या किंमती कमी करण्या संदर्भात केंद्रीय मंत्र्यांना पत्र

Jan 18, 2022

निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीमध्ये शेतकर्यांचा मोठ्या प्रमाणावर खर्च होत आहे. वाढत्या खर्चामुळे शेती करणे परवडेनासे झाले आहे. अशातच अनुदानीत खत पुरवठादारांनी खतांच्या किमती वाढल्या आहेत. ही परिस्थिती लक्षात घेता, राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी खतांच्या वाढलेल्या किमती पूर्ववत करण्यासंदर्भात केंद्रीय खते व रसायन मंत्री मनसुख मंडविया यांना नुकतेच पत्र दिले आहे. त्यावर केंद्रीय मंत्री काय निर्णय घेतात, याकडे शेतकर्यांचे लक्ष लागले आहे.

खतांच्या वाढलेल्या किमती संदर्भात केंद्र सरकारने तातडीने पावले उचलून खतांच्या दरांचा ताबडतोब आढावा घ्यावा आणि खतांच्या दरातील वाढ मागे घेण्यासाठी आवश्यक निर्देश जारी करावेत, अशी मागणी मंत्री भुसे यांनी या पत्राच्या माध्यमातून केली आहे. पत्रातील महत्त्वाचे मुद्दे असे ः खत उत्पादकांनी राज्यात ६ डिसेंबर २०१९ रोजी घोषित केलेल्या दरानुसार खताची विक्री करावी. सुरळीत पुरवठा राखण्यासाठी आणि खतांचा संतुलित वापर याला प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक पावले केंद्रसरकारने उचलावीत. रब्बी हंगाम यशस्वी करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, अशी मागणी केली आहे. १०:२६:२६ हे खत १७० रुपयांनी वाढले आहे. याशिवाय १२:३२:१६ हे खत १५० रुपयांनी, १६:२०:० हे १३ रुपयांनी, अमोनियम सल्फेट १२५ रुपयांनी, १५:१५:१५ खत १९५ रुपयांनी वाढले आहे.

अजून बातम्या वाचा..

मतदार संघातील धार्मिक स्थळ विकासासाठी केंद्राकडून निधी मिळावा – आ. कांदेच्या शिष्ट मंडळाने घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट

मतदार संघातील धार्मिक स्थळ विकासासाठी केंद्राकडून निधी मिळावा – आ. कांदेच्या शिष्ट मंडळाने घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट

नांदगाव - मनमाड शहर तसेच मतदार संघातील धार्मिक स्थळाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्रीय पर्यटन...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी...

read more
नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

    मनमाड येथे *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या वाढदिवसानिमित्त *आमदार...

read more
*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

  *मनमाड* महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे...

read more
.