Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

एस पी एच नामपुर महाविद्यालयात काव्यपुष्प स्पर्धा संपन्न.

Jan 18, 2022

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित समाजश्री प्रशांतदादा हिरे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय नामपुर येथे लोकमाता महिलारत्न माजी आरोग्यमंत्री आदरणीय श्रीमती. पुष्पाताई हिरे यांचा 92 वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आदरणीय ताईसाहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून “काव्यपुष्प स्पर्धेचे” आयोजन महाविद्यालयाचे उपप्राचार्य आदरणीय डॉ.यु बी कदम यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. या स्पर्धेत वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनींनी उस्फूर्तपणे सहभाग घेऊन वेगवेगळे ज्वलंत विषय घेऊन कविता वाचन केले. यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ यु बी कदम यांनी नवयुगाचे कवी व कवयित्री यांचे अभिनंदन करून त्यांचे स्वागत केले व आदरणीय पुष्पाताई हिरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांना उत्तम आरोग्य मिळावे ही प्रार्थना केली. या स्पर्धेत एकूण 15 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला व त्यांच्यापैकी तीन उत्कृष्ट विद्यार्थ्यांचे निवड करण्यात आली .प्रथम क्रमांक वाघ तेजस्विनी गिरीधर .द्वितीय क्रमांक मगर साक्षी विजय व तृतीय क्रमांक धोंडगे कुणाल संजय. असे होय. कार्यक्रमप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री. एस आर निकम ,पर्यवेक्षक श्री एम डी अहिरे, पर्यवेक्षक श्री.ए डी. पाटील ,प्रा एस जी वाघ प्रा डॉ एस टी शेलार उपस्थित होते . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा जितेंद्र एस सूर्यवंशी व आभार प्रा आर पी ठाकरे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व प्राध्यापक प्राध्यापिका यांनी परिश्रम घेतले. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते

अजून बातम्या वाचा..

१ जुलै पासून केंद्राने लागु केलेल्या कायद्याची पोलिस स्टेशनला अमलबजावणी गुन्हेगारांना बसणार जरब

१ जुलै पासून केंद्राने लागु केलेल्या कायद्याची पोलिस स्टेशनला अमलबजावणी गुन्हेगारांना बसणार जरब

  नांदगांव : मारुती जगधने इंग्रज काळातील कायद्यात केंद्र शासनाने बदल केला असून गत ७५ वर्षाहुन...

read more
राज्यात ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करणार  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा

राज्यात ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा

मुंबई, दि. २९: राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन घडविण्यासाठी मुख्यमंत्री...

read more
मिशन विधानसभा – मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अर्थमंत्री अजित पवारांकडून घोषणा

मिशन विधानसभा – मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अर्थमंत्री अजित पवारांकडून घोषणा

मुंबई, 28 जून : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी राज्याचे अर्थमंत्री...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]