मनमाड येथील कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये १५ ते १८ वयोगटाच्या विद्यार्थ्यांना उपजिल्हा रुग्णालयातर्फे कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. के.आर. टी शाळेच्या विद्यार्थ्यांबरोबरच सेंट झेवियर ,हायस्कूल, सरस्वती विद्यामंदिर,संत बार्णबा शाळा,विद्या इंटरनॅशनल शाळेतील विद्यार्थ्यांसह के. आर. टी शाळेतील माजी विद्यार्थ्यांना लस देण्यात आली. याप्रसंगी उपजिल्हा रुग्णालयाचे अधिकारी व कर्मचारी ट्रिकर आशा स्वयंसेविका ऑपरेटर श्रीमती मनोरमा शिंदे, श्रीमती मोहिनी मैंद,जुबेर शेख यांसह शाळेचे मुख्याध्यापक दीपक व्यवहारे, विश्वस्त धनंजय निंभोरकर, प्राचार्य मुकेश मिसर, उपप्राचार्य वैभव कुलकर्णी यांनी आभार मानले. १५१ विद्यार्थ्यांनी या लसीकरण मोहिमेचा लाभ घेतला.यावेळी शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.
साईराज राजेश परदेशी ने पटकावले सुवर्णपदक
अहमदाबाद येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप या अंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत साईराज...









