loader image
[ays_poll id=7]

गोदावरी एक्सप्रेस मनमाड येथूनच सुरू करावी : रिपाईची मागणी

Jan 26, 2022

राज्यराणी , तपोवननंतर आता मनमाड- गोदावरी एक्सप्रेस पळविण्याचा घाट घातला जात असल्याने मनमाडकरांनी संताप व्यक्त केला आहे . हिंगोलीच्या नागरिकांना मुंबईला जाण्यासाठी सोयीचे व्हावे , यासाठी मनमाड – मुंबई गोदावरी एक्सप्रेस ही हिंगोलीपर्यंत नेण्याची मागणी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी केली आहे . त्यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना तसे पत्र लिहिले आहे . सध्या गोदावरी एक्सप्रेस ( गाडी नं .१२११७ आणि १२११८ ) कोरोना संकटामुळे दोन वर्षापासून बंद आहे . ती सुरू करण्याची जोरदार मागणी असूनही रल्वे दुर्लक्ष करीत आहे . मनमाडहून सुटणारी गोदावरी एक्सप्रेस मुंबईला जाण्यासाठी मनमाडसह , लासलगाव , निफाड व नाशिक जिल्हा व शहरातील नागरिकांसाठी सोयीची गाडी आहे . गोदावरी एक्सप्रेस हिंगोलीपर्यंत नेऊ नये , अशी मागणी मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील सर्व प्रवासीधारकांची आहे . गोदावरी एक्सप्रेस ही पंचवटीप्रमाणेच मनमाडसह जिल्ह्यातील नागरिकांची सोयीची व आवडीची आहे . राज्यराणी एक्सप्रेस मनमाड – मुंबई अशी होती ती जालन्यापर्यंत नेण्यात आली आता जर गोदावरी एक्सप्रेस पळविण्याचा प्रयत्न केला तर आरपीआय ( आठवले ) उग्र स्वरूपाचे आंदोलन हाती घेईल , असा इशारा रिपाइंचे नगरसेवक तथा जिल्हाकार्याध्यक्ष गंगाभाऊ त्रिभुवन यांनी दिला आहे . सदर गाडी ही मनमाड स्थानकातून लवकरात लवकर सूरू करावी , अशी मागणी केली आहे .

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी...

read more
नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

    मनमाड येथे *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या वाढदिवसानिमित्त *आमदार...

read more
*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

  *मनमाड* महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे...

read more
तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुन्हा एकदा मनमाडच्या खेळाडूंचा डंका तळेगाव दाभाडे पुणे येथे 23...

read more
.