Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

सेंट झेवियर्स हायस्कूल मनमाड मध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न .

Jan 26, 2022

मनमाड येथील सेंट झेवियर्स हायस्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.यावेळी शाळेचे माजी मुख्याध्यापक माननीय फादर केनेथ डिसूजा यांच्या हस्ते ध्वज फडकवण्यात आला. याप्रसंगी शाळेचे माननीय मुख्याध्यापक फादर सॕबी कोरिया, पर्यवेक्षिका सिस्टर शैला, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अर्चना निकाळे मॅडम, सेंट मेरीज हायस्कूल च्या माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष श्री. गुरुदीपसिंग कांत, पदाधिकारी श्री. लवकुमार माने, श्री. फ्रान्सिस फर्नांडिस, फादर लॉईड, शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका सौ.साळी मॅडम, आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. शालेय गायकवृंदासोबत उपस्थित सर्वांनी राष्ट्रगीत व ध्वजगीत गायिले.श्रीराज तुरकणे याने प्रतिज्ञा वाचन केले तर कु.राधा काळे हीने संविधानाचे वाचन केले. शाळेचे माननीय मुख्याध्यापक फादर सॕबी कोरिया व पर्यवेक्षिका सिस्टर शैला यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला. याप्रसंगी गेल्या वर्षी दहावीच्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. जयश्री पारखे मॅडम ,श्री. सुधाकर कातकडे सर व श्री. हेमंत वालेसर यांनी केले. तर आभार प्रदर्शन सौ.पानपाटील मॅडम यांनी केले.

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे आयोजित संघटन पर्व 2024-25 अंतर्गत भाजपा सदस्य नोंदणी अभियानाला उस्फुर्त प्रतिसाद

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे आयोजित संघटन पर्व 2024-25 अंतर्गत भाजपा सदस्य नोंदणी अभियानाला उस्फुर्त प्रतिसाद

विश्वातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असणाऱ्या भाजपा च्या संघटन पर्व 24-25 अंतर्गत मनमाड शहर भाजपा...

read more
के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर. मुख्याध्यापक दीपक व्यवहारे. उपप्राचार्य...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]