मनमाड : आज देशाच्या 73 व्या प्रजासत्ताक दिन व्हिक्टरी गृप तर्फे डोणगाव रोड येथील आश्रम शाळेमध्ये साजरा करण्यात आला . सध्या वाढलेली थंडी लक्षात घेऊन कानटोपी आणि खाऊ वाटप करण्यात आले. ग्रुपचे सदस्य श्री एकनाथ बोडखे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी इंजि. विक्रम चव्हाण , डॉ. विनोद ठाकरे , आण्णा सोनवणे , संदिप शिनकर , प्रशांत कापसे , विशाल निकम , अजय गवळी आदी सदस्य उपस्थित होते.
नांदगाव विधानसभा मतदार संघातील रणखेडा व बिरोळे येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत प्रत्येकी ५० लाख रुपये किंमतीच्या दोन पाणीपुरवठा योजनांचे भूमिपूजन आमदार सुहास कांदे यांचे पुतणे किरण कांदे यांचे हस्ते आज करण्यात आले.
रणखेडा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या रामवाडी व बिरोळे ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सतीचा माता...










