Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

पानेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी गणवेश वाटप न झाल्याने पालक वर्गात संताप

Jan 28, 2022

पानेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी मोफत देण्यात येणारे गणवेश मुख्याध्यापक व शालेय समितीच्या हलगर्जीपणामुळे मिळाले नसल्याने पालकांनी मुख्याध्यापकांना धारेवर धरत जाब विचारला मात्र उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने पालकांनी संताप व्यक्त केला

 
पानेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत सर्व शिक्षण अभियान अंतर्गत अनुसूचित जाती, जमातीच्या विद्यार्थीसह सर्वच विद्यार्थिनींना गणवेश घेण्यासाठी शासनाकडून पैसे आले आहे. सदरचे पैसे हे शाळेच्या खात्यात जमा करण्यात आले आहे मात्र शाळेचे मुख्याध्यापक व शालेय समितीने विद्यार्थ्यांना  २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी गणवेश वाटप करणे बंधनकारक असतांना एकही विद्यार्थ्यांला गणवेश देण्यात आला नाही त्यामुळे पालक वर्गात संताप व्यक्त करण्यात आला. सदर शाळेचे ध्वजवंदन झाल्यानंतर सर्व पालकांनी याबाबत शालेय समिती व मुख्याध्यापक यांना जाब विचारला मात्र गोंधलेल्या मुख्याध्यापक आणि शालेय समितीच्या सदस्यांनी शिक्षण विभागाकडून पैसे मिळाले नसल्याचे कारण पुढे केले तर एक दोन दिवसात गणवेश देऊ असे सांगितले शासन  विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देणार आहे तालुक्यातील इतर सर्व शाळांना शासनाकडून गणवेशासाठी पैसे आले असतांना तुमच्याकडेच का आले नाही? याबाबत जाब विचारून शाळा प्रशासनाला धारेवर धरले. त्यामुळे शाळेत यावेळी चांगलाच गोंधळ उडाला होता. परंतु ग्रामपंचायतीचे ज्येष्ठ माजी सरपंच बाळासाहेब आव्हाड यांनी मध्यस्थीती केल्यानंतर वादावर पडदा पडला. दरम्यान सदरचे या शाळेचे मुख्याध्यापक हे मालेगाव येथून अप-डाऊन करतात त्यामुळे शाळेचा कारभार ते सांभाळण्यास नेहमी अपयशी ठरत असल्याने त्यांच्या बदलीची मागणी यावेळी नागरिकांनी केली.

अजून बातम्या वाचा..

बाळासाहेबांच्या विचारांशी प्रामाणिक असलेला कडवट, सच्चा शिवसैनिक गमावला – मुख्यमंत्री शिंदे यांचेकडून शोक व्यक्त

बाळासाहेबांच्या विचारांशी प्रामाणिक असलेला कडवट, सच्चा शिवसैनिक गमावला – मुख्यमंत्री शिंदे यांचेकडून शोक व्यक्त

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ नेते मनोहर जोशी सरांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय दुःख...

read more
🔶 फलक रेखाटन🔶 दि. २३ फेब्रुवारी २०२४ स्वच्छतेचे पुजारी , संत गाडगेबाबा जयंती निमित्त फलक रेखाटनातून विनम्र अभिवादन !!

🔶 फलक रेखाटन🔶 दि. २३ फेब्रुवारी २०२४ स्वच्छतेचे पुजारी , संत गाडगेबाबा जयंती निमित्त फलक रेखाटनातून विनम्र अभिवादन !!

फलक रेखाटन- देव हिरे.(कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर संचालित, नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव....

read more
भर बाजारपेठेत झालेल्या चोरी बाबत व्यापारी महासंघातर्फे पोलीस स्टेशनला निवेदन

भर बाजारपेठेत झालेल्या चोरी बाबत व्यापारी महासंघातर्फे पोलीस स्टेशनला निवेदन

मनमाड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या एकात्मता चौक येथील दुकानांमध्ये 21 फेब्रुवारीच्या रात्री...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]