Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

रेल्वे प्रशासनाने विविध प्रश्नांवर त्वरित तोडगा काढावा – शिवसेनेची रेल्वे महाप्रबंधकांकडे मागणी

Jan 28, 2022

आज रेल्वे महाप्रबंधक लाहोटी यांचा नांदगाव रेल्वे स्थानक येथे दौरा पार पडला. नांदगाव शिवसेनेच्या शिस्टमंडळाने त्यांची भेट घेऊन विविध प्रश्नांवर चर्चा केली व निवेदन देऊन त्वरित तोडगा काढून प्रश्न मार्गी लावण्याची आग्रही मागणी केली.शहरातील अंडर बायपास शी संबंधित समस्यांचे निराकरण व्हावे, नांदगाव स्थानकावरील सर्व गाड्यांचे थांबे पूर्ववत करावेत, मनमाड स्थानकाहुन सुटणारी गोदावरी एक्स्प्रेस त्वरित सुरू करावी, नांदगाव आणि मनमाड येथून अप डाऊन करणाऱ्या पास धारकांना पासची सुविधा त्वरित उपलब्ध करून देण्यात यावी, मनमाड स्थानकावर मासिक पास खिडकी सुरू करण्यात यावी या प्रमुख मागण्यांचे निवेदन महाप्रबंधक यांना देण्यात आले.याप्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख किरण देवरे,गुलाब भाबड,अमोल नावंदर,सुनील जाधव,भाऊराव बागुल, भैयासाहेब पगार आदींसह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

महावितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा कडेलोट – सर्वपक्षीय  वीज ग्राहक समितीचा आंदोलनाचा इशारा

महावितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा कडेलोट – सर्वपक्षीय वीज ग्राहक समितीचा आंदोलनाचा इशारा

मनमाड शहरासह ग्रामीण भागात महावितरण च्या गलथान कारभारामुळे नागरिक हैराण झालेले आहेत,वारंवार वीज...

read more
अनियमित/खंडित वीज पुरवठा मनमाडच्या महावितरण अधिकाऱ्यांना भाजपा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी धारेवर धरित विचारला जाब

अनियमित/खंडित वीज पुरवठा मनमाडच्या महावितरण अधिकाऱ्यांना भाजपा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी धारेवर धरित विचारला जाब

मनमाड - शहरात गेल्या 11 दिवसा पासून दररोज अवकाळी पाऊस पडतो आहे या पावसाचे कारण सांगून महावितरण...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]