Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

महाप्रबंधक आले आणि गेले, प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर

Jan 29, 2022

दौऱ्यासाठी आलेले मध्य रेल्वेचे महाप्रबंधक अनिल कुमार लाहोटी एका डब्यातून उतरून दुसऱ्या डब्यात जाऊन बसले आणि आदरातिथ्य घेऊन साहेब पुढील दौऱ्यासाठी रवाना झाले अतिशय संवेदनशील असलेल्या मनमाड रेल्वे स्थानकाच्या समस्या, विकास कामांकडे ढुंकूनही न पाहता पुढे गेल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे

सदैव चर्चेत राहणारे मनमाड रेल्वे स्थानक आज चकाचक दिसत होते रेल्वेचे महाप्रबंधक अनिल कुमार लाहोटी यांचा अल्प काळाचा पाहणी दौरा होता सकाळी ८ : ३० ला फलाट क्रमांक एकवर आपल्या विशेष गाडीने ते दाखल झाले येथे काही वेळ थांबल्यानंतर ते भुसावळ विभागातील इतर रेल्वे स्थानकाच्या निरीक्षणासाठी तातडीने मार्गस्थ झाले मनमाडसह पानेवाडी येथील तेल कंपन्यांच्या परिसरात असलेली रेल्वे यार्ड तसेच नांदगाव, चाळीसगाव, जळगाव आदी विविध रेल्वे स्थानकाचे निरीक्षण करण्यासाठी आले होते मनमाड जंक्शन रेल्वे स्थानकात भुसावळ मंडल रेल प्रबंधक तसेच रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी मनमाड रेल्वे स्टेशन प्रबंधक आदींनी अनिल कुमार लाहोटी यांचे स्वागत केले मनमाड जंक्शन रेल्वे स्थानकाचे निरीक्षण यापूर्वीच झालेले असल्याने साहेबांनी पाहणी न करताच पुढे मार्गस्थ झाले मात्र अधिकारी वर्गाचा पुढील पाहणी दौरा मनमाड येथून सुरू होणार असल्याने रेल्वे स्थानकात गेल्या काही दिवसापासून व्यापक आणि जय्यत तयारी सुरू होती सकाळी रेल्वे स्थानकात सनईचे मंजुळ स्वर ऐकू येत होते, सर्वत्र स्वच्छता करण्यात आली सर्वत्र झाडाच्या, फुलांच्या कुंड्या दिसत होत्या साहेब आले एका बोगीतून उतरून दुसऱ्या बोगीत जाऊन बसले आणि लगेच येथून ते आपल्या निरीक्षण दौर्‍यासाठी मार्गस्थ झाले मात्र मनमाड जंक्शन रेल्वे स्थानकांची कोणतीही पाहणी न करताच ते पुढे मार्गस्थ झाले मात्र विभागातील पाहणी दौऱ्याची सुरुवात मनमाड येथून असल्यामुळे मनमाड जंक्शन रेल्वे स्थानकात आज सकाळपासून उच्चस्तरीय रेल्वे अधिकाऱ्यांची मोठी धावपळ सुरू असल्याचे चित्र दिसून आले मात्र साहेब आल्यामुळे मनमाड रेल्वे स्थानकाचे रुपडेच पालटले होते

अजून बातम्या वाचा..

जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, चांदवड व निफाडसह राज्यातील 19 तालुक्यात पिकांचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश

जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, चांदवड व निफाडसह राज्यातील 19 तालुक्यात पिकांचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, आणखी १९ तालुक्यांमध्ये #दुष्काळ जाहीर...

read more
रोजगार महाकुंभ’ भव्य रोजगार मेळावा उत्साहात संपन्न. ११ कंपन्यांचा सहभाग; 236 पेक्षा जास्त युवकांचे रजिस्ट्रेशन आणि जवळपास 162 युवकांची अंतरिम निवड

रोजगार महाकुंभ’ भव्य रोजगार मेळावा उत्साहात संपन्न. ११ कंपन्यांचा सहभाग; 236 पेक्षा जास्त युवकांचे रजिस्ट्रेशन आणि जवळपास 162 युवकांची अंतरिम निवड

नाशिकच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला,...

read more
चांदवड तालुक्याचा ट्रिगर-1 मध्ये समावेश करावा – आमदार आहेर यांची मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांकडे मागणी

चांदवड तालुक्याचा ट्रिगर-1 मध्ये समावेश करावा – आमदार आहेर यांची मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांकडे मागणी

राज्यातील २६८ तालुक्यांमध्ये खरीप हंगामासाठी ‘ट्रिगर-१’ लागू करून दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]