loader image
[ays_poll id=7]

मनमाड लोहमार्ग पोलिसांची कामगिरी : परप्रांतीय चोरट्यास मुद्देमालासह अटक

Jan 29, 2022


रांजणगाव (जिल्हा पुणे) एमआयडीसी पोलीस स्थानकाच्या हद्दीत जबरी चोरी करून उत्तर प्रदेशातील आपल्या गावी धावत्या रेल्वे गाडीत संशयित आरोपी पळून जात असल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांना मिळाली. रेल्वे स्थानकात शोध मोहीम सुरू केली असता उभ्या असलेल्या रेल्वेगाडीतून संशयित आरोपीला पकडण्यात लोहमार्ग पोलिसांना यश आले आहे. सदर संशयित आरोपीकडे ९० हजार रूपयांची रोख रक्कम हस्तगत करून ती रांझणगांव पोलिसांकडे  सुपूर्द करण्यात आले.

पुणे पोलिसांकडून याबाबतची माहिती व संशयित आरोपीचा फोटो मनमाड लोहमार्ग पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी अवघ्या काही वेळातच या आरोपीला स्थानकावर थांबलेल्या रेल्वे गाडीतून ताब्यात घेतले . पुणे परिसरात चोरीची घटना घडली होती. याबाबत रांजणगांव एमआयडीसी पोलिस ठाण्यामध्ये  जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील संशयित आरोपी नवीन प्रदीप निषाद ( वय २२, रा . कोरापट्टी, जि. जौनपुर , उत्तरप्रदेश) याचा ठावठिकाणा घेतल्यानंतर हा आरोपी  पुणे – गया  या रेल्वे गाडीने गावी पळून जात असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने मनमाड लोहमार्ग पोलिस स्थानकाशी संपर्क करत माहिती व संशयिताचा फोटो दिला. माहिती मिळताच लोहमार्ग पोलिस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथक अलर्ट झाले. उत्तर प्रदेशमध्ये जाणाऱ्या गाड्यांवर त्यांनी लक्ष केंद्रीत केले . पुणे – गया ही गाडी मनमाड रेल्वे स्थानकांत उभी असतांनाच उपनिरीक्षक मधुकर लोखंडे , कर्मचारी दिनेश पवार , संतोष भालेराव , संजय केदारे , संजय निकम , निलेश कुसराम , महिला पोलिस कर्मचारी संतोषी राठोड व पो.ह.बच्छाव आदींनी बोगीमध्ये गाडीत शोधमोहिम सुरू केली मिळालेल्या माहितीनुसार पळून चाललेला संशयित आढळून आला असता त्याला ताब्यात घेतले त्याच्याकडे एक बॅग आणि दुसरी बॅग त्याने दुसऱ्या  बोगीमध्ये लपवून ठेवली होती. या लपवलेल्या बॅगेत  ९० हजार रूपयांची रोकड मिळून आली. 


अजून बातम्या वाचा..

भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन

भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या...

read more
रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक तर्फे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर अनकाई येथे संपन्न

रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक तर्फे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर अनकाई येथे संपन्न

  दिनांक 17 मंगळवार रोजी अनकाई येथे रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक आणि रोटरी आय हॉस्पिटल मालेगाव...

read more
महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

  मनमाड :- महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड,...

read more
व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

मनमाड -- मनमाड शहर व्यापारी महासंघ चे अध्यक्ष राजाभाऊ पारीक तसेच त्यांचे लहान बंधू अनिल पारीक व...

read more
.