Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

सौ. क. मा. कासलीवाल प्राथमिक विद्यालयात महात्मा गांधी यांची पुण्यतिथी व हुतात्मा दिन साजरा !

Jan 31, 2022

नांदगाव येथील सौ.क.मा.कासलीवाल विद्यालयात महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून दोन मिनिटे मौन धारण करून शहीद हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी यांच्या आवडीच्या “रघुपती राघव राजाराम पतित पावन सिताराम” या भजनाचे गायन केले. त्याचप्रमाणे शिशु विहारातील शिक्षिकांनी “युग बदलाने आया गांधीजी” हे भजन गायले. कु.पुष्पक संजय त्रिभुवन या विद्यार्थ्याने गांधीजींची वेशभूषा केली होती. कु.अनस मतीन शेख व कु. माधव गायकवाड या विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवन चरित्राला उजाळा दिला व त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांसमवेत शिक्षकांनी परिसर स्वच्छता केली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेचे मुख्याध्यापक सावंत.व्ही.पी. व शिक्षक वृंद यांनी प्रयत्न केले.

अजून बातम्या वाचा..

अंगणवाडी ताई करत आहे आदिवासी भागातील बालकांसाठी आणि महिलांसाठी पारंपारिक खाद्यपदार्थ बनवण्याचे मार्गदर्शन

अंगणवाडी ताई करत आहे आदिवासी भागातील बालकांसाठी आणि महिलांसाठी पारंपारिक खाद्यपदार्थ बनवण्याचे मार्गदर्शन

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प नागरी नाशिक -२ अंतर्गत अंगणवाडी क्र.६३.येवला .अंगणवाडी...

read more
सौ. अंजुम सुहास कांदे यांच्या वाढदिवसानिमित्त १०० गरजू कुटुंबांना गॅस शेगडी चे वाटप

सौ. अंजुम सुहास कांदे यांच्या वाढदिवसानिमित्त १०० गरजू कुटुंबांना गॅस शेगडी चे वाटप

सौ.अंजुमताई सुहास कांदे यांच्या वाढदिवसानिमित्त मनमाड येथील गरजू कुटुंबीयांना गॅस शेगडीचे वाटप...

read more
मध्य रेल्वे माध्यमिक विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न, तब्बल २२ वर्षानी दिला आठवणींना उजाळा

मध्य रेल्वे माध्यमिक विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न, तब्बल २२ वर्षानी दिला आठवणींना उजाळा

मनमाड : येथील मध्य रेल्वे माध्यमिक  विद्यालय (इंडियन हायस्कूलच्या) २००० मधील दहावी एसएससीच्या...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]