
महाराष्ट्रात होणारा वेदांता प्रकल्प हा केंद्र सरकारने हस्तक्षेप करत गुजराथ मध्ये नेल्याने महाराष्ट्रातील लाखो तरुणांचा रोजगार हिरावला गेला असून ह्या सर्व प्रक्रियेला महाराष्ट्रातील शिंदे फडणवीस नाकर्तेपणाच जबाबदार असल्याचे नांदगाव व मनमाड शहर युवा सेनेच्या वतीने राज्य सरकारचा घंटानाद करत निषेध करण्यात येऊन स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. या प्रसंगी अंकुश गवळी, युवा सेनेचे सनी फसाटे,इरफान शेख,राहील मंसुरी,अमोल दंडगव्हाळ,पवन पवार,छोटू राऊत,नदीम शेख,समीर खान,वसीम शेख,सलमान शेख,सागर गवळी,बंटी गवळी,जाफर शाह,विशाल भोसले,योगेश केदारे,मुजीब शेख,मुकूंद एलिंजे,राज परदेशी,उमेश झोडपे,भारत झालटे, असलंम शेख,दयाराम जाधव,अमोल आहीरे यांसह मोठ्या संख्येने युवा सैनिक उपस्थित होते.













