नाशिक जिल्हा नियोजन समिती सदस्यपदी जिल्हा मजूर संघाचे संचालक तथा नांदगाव तालुक्यातील वेहेळगाव येथील रहिवासी प्रमोद भाबड यांची निवड झाली. त्यांच्या निवडीबद्दल तालुक्याचे आमदार सुहास कांदे यांचे वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना नांदगाव तालुका प्रमुख किरण देवरे, युवासेना उपजिल्हा अधिकारी मुन्ना दरगुडे, नांदगाव शहरप्रमुख सुनील जाधव, युवासेना ता.प्रमुख सागर हिरे, भैयासाहेब पगार, अनिल धामणे, पप्पू बागुल, भरत पारख, बापू जाधव, नितीन सोनवणे, भाऊसाहेब बुरकुल, अरिफ शेख, विशाल जाधव, भूषण थोरात व शिवसैनिक उपस्थित होते.
प्रकृती स्कूलचा दिवाळीचा अनोखा आनंदोत्सव पोलिस बांधवांसोबत
दिवाळी हा आनंद, प्रेम, आपुलकी आणि सामाजिक बांधिलकी जपणारा सण. या वर्षाची दिवाळी वेगळ्या पद्धतीने...











