loader image
[ays_poll id=7]

10वी आणि 12वीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात येणार

Feb 3, 2022


 महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्यावतीनं 10वी आणि 12वीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात येणार आहे. अशी माहिती बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.

 बोर्डाच्या अध्यक्षांनी ‘ही’ महत्वाची माहिती दिली :

 परीक्षा ऑफलाईनच होणार – दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनंच होणार असून ठरलेल्या वेळेतच परीक्षा होणार असल्याचं बोर्डाच्या अध्यक्षांनी स्पष्ट केलं आहे.

 स्वत:च्या शाळेत परीक्षा देण्याची संधी – विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेतचं परीक्षा देता येणार आहे. ज्या शाळेत 15 पेक्षा कमी विद्यार्थी असतात तिथं जवळच्या शाळेत विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र देण्यात येईल.

 12वीच्या लेखी आणि प्रात्याक्षिक परीक्षा – 12वीच्या प्रात्याक्षिक परीक्षा, श्रेणी परीक्षा 14 फेब्रुवारी ते 3 मार्च मध्ये होतील. कोरोना आणि इतर कारणामुळं अडचण आल्यास 31 मार्च ते 18 एप्रिल या कालावधीत प्रात्यक्षिक परीक्षा होतील.

 दहावीच्या लेखी आणि प्रात्याक्षिक परीक्षा – दहावीच्या प्रात्याक्षिक, तोडी परीक्षा 25 फेब्रुवारी ते 3 मार्च या कालावधीत परीक्षा होईल. काही कारणामुळं प्तात्याक्षिक परीक्षा देता आली नाही तर 5 एप्रिल ते 22 एप्रिल पर्यंत होतील.

 विद्यार्थ्यांना भेटणार वाढीव वेळ

  •  40 ते 60 गुणांच्या परीक्षेसाठी 15 मिनिटं जादा वेळ, 70 ते 100 गुणांच्या परीक्षांसाठी अर्धा तास अधिकचा वेळ देण्यात येणार आहे.
  •  त्यानुसार 11 वाजता सुरु होणार पेपर पेपर 10.30 वाजता सुरु होईल. विद्यार्थ्यांच्या हातात 10.20 आणि दुपारच्या सत्रात 2.50 वाजता प्रश्नपत्रिका देण्यात येईल.
  •  दरम्यान, बारावीच्या लेखी परीक्षा 4 मार्च ते 30 मार्च या कालावधीत होणार आहेत. तर दहावीच्या परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिल या काळात होतील

अजून बातम्या वाचा..

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा समन्वयक यांच्या संयुक्त विद्यमाने...

read more
जिल्हा परिषद निवडणूक मुदत वाढीसाठी राज्य निवडणुक आयोगाचा सर्वोच्च न्यायालयात अर्ज

जिल्हा परिषद निवडणूक मुदत वाढीसाठी राज्य निवडणुक आयोगाचा सर्वोच्च न्यायालयात अर्ज

स्थनिक स्वराज्य संस्था निवडणुकीची गुंतागुंत अधिकाधिक वाढत चालली असून आता राज्य निवडणूक आयोगाने...

read more
मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्रात नंबर एक राहिलेल्या भारतीय जनता...

read more
.