loader image
[ays_poll id=7]

पंतप्रधान आवास योजनेच्या तुटपुंज्या अनुदानामुळे ग्रामीण भागात अनुदान वाढवून मिळावे – मागणी

Feb 7, 2022

पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलांना शहरी भागामध्ये दोन लाख पन्नास हजार रुपये तर ग्रामीण भागामध्ये एक लाख चाळीस हजार रुपये अनुदान दिले जाते मात्र ग्रामीण साठी दिले जाणारे अनुदान तुटपुंजे असून वाढत्या महागाईत घर बांधणीचे साहित्य महागल्यामुळे या किंमतीत घर उभारू शकत नसल्याने ग्रामीण भागात लाभार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे अतिरिक्त कर्ज घेऊन घराचे स्वप्न पूर्ण करावे लागत आहे अनुदान वाढवून देण्याची मागणी केली जात आहे

पंतप्रधान आवास योजनेसाठी ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना एक लाख वीस हजार रुपये आणि रोजगार हमी योजनेअंतर्गत वीस हजार रुपये असे एकूण एक लाख चाळीस हजार रुपये शासनामार्फत अनुदान देण्यात येते. यामध्ये शहरी भागांमध्ये दोन लाख पन्नास हजार अनुदान देण्यात येते. ग्रामीण भागांमध्ये सिमेंट, लोखंड, रेती, विटा आदी बांधकाम साहित्य हे मिळत नाही अनेकदा शहरातून वाहतूक करून आणावे लागते त्यामुळे हे साहित्य कमी खर्चात मिळते का? असा प्रश्न निर्माण झालेला आहे. ग्रामीण भागामध्ये सिमेंट, लोखंड, रेती, विटा, मजुरी आदी बांधकाम साहित्य परवडत नाही उलट ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्यांना बांधकाम साहित्य ने-आण करण्यासाठी वाहतूकखर्च अतिरिक्त लागत असतो तर ग्रामीण भागात खर्च जास्त आणि शहरी भागात खर्च कमी लागत असतो तरीही  शासनाकडून शहरासाठी जास्त अनुदान आणि ग्रामीण भागासाठी कमी अनुदान दिले जाते सध्या महागाई गगनाला भिडली आहे सर्वच वस्तूंचे दर वाढले आहे त्यामुळे वाहतूक वाढली आणि मजुरी देखील वाढली आहे त्यामुळे एक लाख चाळीस हजार हे पंतप्रधान आवास योजनेचे मिळणारे अनुदान परवडत नाही उलट घरातून पैसे घालावे लागतात त्यामुळे अतिरिक्त कर्ज उचलावे लागते शासनाने वाढत्या महागाईचा विचार करून अनुदान द्यावे कमी पैशात घर उभे राहत नाही अनेकदा अर्धवट घर उभे राहते पैसे संपले असल्याने इकडून तिकडून पैसे जमा करून घराचे स्वप्न पूर्ण करावे लावते त्यामुळे शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागात सुद्धा अडीच लाख रुपये अनुदान शासनाने द्यावे, अशी ग्रामस्थ मागणी करत आहे. जेव्हा केंद्र शासना मार्फत २०१५ ला पंतप्रधान आवास योजेनेच्या प्रारंभ झाला त्या तुलनेत आजचे बांधकाम साहित्य सिमेंट, लोखंड, विटा, आदी चे दर दुपटीने वाढले आहे. तर बांधकामासाठी लागणारी मजुरी चार पटीने वाढलेली आहे. तेव्हा ग्रामीण भागांमध्ये एक लाख चाळीस हजारात घराचे बांधकाम कसे शक्य होईल असा प्रश्न लाभार्थी उपस्थित करीत आहेत.

अजून बातम्या वाचा..

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

दिनांक 26/8/2025 रोजी के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र...

read more
भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

आज दि.२६ ऑगस्ट २०२५ रोजी शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय...

read more
मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड - बुधवार दिनांक 27 /08/2025 रोजी भाद्रपद शुध्द श्री गणेश चतुर्थी निमित्त सकाळी ठीक 09-30...

read more
मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर मंडलाच्या वतीने स्वतंत्र हिंदुस्थान च्या 79 व्या स्वातंत्र्य दिना...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला....

read more
.