दि.८/२/२०२२ मंगळवार रोजी सिकंदर नगर भागातील स्थानिक नागरिकांनी शाळेला भेट दिली व कशा प्रकारे विद्यार्थ्यांना शिकवले जाते तसेच कोरोना काळात ऑनलाईन आणि ऑफलाईन शिक्षण पद्धतीची तफावत जाणून घेऊन याची पाहणी करण्यात आली.. विद्यार्थ्यांना सेवानिवृत्त शिक्षक श्री.नईम सर व सलिम सर यांनी मुलांना विविध प्रश्न विचारून चाचपणी केली तसेच शिक्षकांना मार्गदर्शन केले. पालकांनी आपल्या पाल्यांकडे गंभीर रित्या लक्ष दिल्यास आणि आपली जबाबदारी पार पाडल्यास मुलांचे शैक्षणिक नुकसान वाचेल. तसेच शिक्षण मंडळाने संगणक ज्ञान, मानसिक विकासा बरोबर शारीरिक आणि सर्वांगीण विकास होईल त्यासाठी आवश्यक ते संगणक व क्रिडा साहित्य उपलब्ध करुन द्यावे असे मनोगत खालिद शेख यांनी व्यक्त केले. या प्रसंगी हाफिज साकिब मौलाना, लतिफ मनियार, हनिफ शेख, आकिब शेख व हारिस शेख उपस्थित होते.
साईराज राजेश परदेशी ने पटकावले सुवर्णपदक
अहमदाबाद येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप या अंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत साईराज...










