Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्या विरोधात मनमाड शहर काँग्रेसकडून मांफी मागो आंदोलन .

Feb 10, 2022

   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्या विरोधात मनमाड शहर काँग्रेसकडून काल मांफी मागो आंदोलन करण्यात आले.भाजप नेत्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणीही यावेळी केली. केंद्र सरकार आणि भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी करत पोलिस प्रशासनाला निवेदन देण्यात आले.       

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर प्रखर टीका केली होते. देशाच्या दुरावस्थेला काँग्रेसच जबाबदार असल्याचे म्हणत मोदींनी जवाहरलाल नेहरूंच्या धोरणावरही टीका केली तर नेहरूंमुळे गोवा दीर्घकाळ पारतंत्र्यात राहिला. काँग्रेसमुळे देशाला आणीबाणीला सामोरं जावं लागले, अशी टीका मोदींनी केली. याशिवाय देशात कोरोना पसरण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेस जबाबदार असल्याचे पंतप्रधान मोदी राज्यसभेत म्हणाले होते. कोरोना काळात महाराष्ट्रातून ट्रेनभरून लोक महाराष्ट्रातून उत्तर प्रदेश, बिहार इ. ठिकाणी जात होती. त्यामुळे देशभरात कोरोना पसरला असे मोदींनी म्हटले होते. मोदींच्या या विविध वक्तव्यांविरोधात आज
शहरध्यक्ष अफजल शेख यांच्या नेतृत्वाखाली मनमाड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीतर्फे मोदींचा, केंद्र सरकार आणि भाजपचा निषेध करत टीका केली काँग्रेस भवन समोर निदर्शने करण्यात आली यावेळी जोरदार घोषणाबाजी केली गेली खोटे वक्तव्य नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत केले. जे अतिशय दुर्भाग्यपूर्व आहे. महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील लोकांना अपमान करणारा आहे. वास्तविक जगात कोरोनाने धुमाकूळ घातला असताना नमस्ते ट्रम कार्यक्रम घेऊन मोदींनी कोरोनाची गर्दी केली. तसेच वेळेवर विमान सेवा बंद केली नाही, अशी सत्य परिस्थिती असताना मोदींनी खोटे भाषण करून कॉंग्रेस पक्षाची उत्तरप्रदेशी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून काँग्रेसला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. असे पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यावेळी  संतोष आहिरे, नाजिम शेख,संजय निकम, अॅड. वाल्मीक जगताप, अशोक व्यवहारे, बाळकृष्ण मिसर, भीमराव जेजुरे, एड शशिकांत व्यवहारे, कॉ रहेमान शहा, फकिरराव शिवदे, साहेबराव बिडगर, अफरोज शेख, सलमान शेख आदि उपस्थित होते .

अजून बातम्या वाचा..

१ जुलै पासून केंद्राने लागु केलेल्या कायद्याची पोलिस स्टेशनला अमलबजावणी गुन्हेगारांना बसणार जरब

१ जुलै पासून केंद्राने लागु केलेल्या कायद्याची पोलिस स्टेशनला अमलबजावणी गुन्हेगारांना बसणार जरब

  नांदगांव : मारुती जगधने इंग्रज काळातील कायद्यात केंद्र शासनाने बदल केला असून गत ७५ वर्षाहुन...

read more
राज्यात ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करणार  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा

राज्यात ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा

मुंबई, दि. २९: राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन घडविण्यासाठी मुख्यमंत्री...

read more
मिशन विधानसभा – मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अर्थमंत्री अजित पवारांकडून घोषणा

मिशन विधानसभा – मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अर्थमंत्री अजित पवारांकडून घोषणा

मुंबई, 28 जून : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी राज्याचे अर्थमंत्री...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]