Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मोदींच्या वक्तव्याचा नांदगाव काँग्रेसने केला निषेध!

Feb 10, 2022

काँग्रेस पक्षाने संपूर्ण देशामध्ये कोरोना पसरविला असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेमध्ये केले. जे अतिशय दुर्भाग्यपूर्ण आहे. हि बाब महाराष्ट्राचा व महाराष्ट्रातील जनतेचा घोर अपमान करणारी आहे. वास्तविक कोरोनाने संपूर्ण जगामध्ये धुमाकूळ घातलेला असतांना नमस्ते ट्रम्प हा कार्यक्रम घेऊन मोदींनी लाखोंची गर्दी केली, त्या माध्यमातून कोरोना देशात पसरविला. मोदींनी ट्रम्पचा कार्यक्रम घेण्या करिता विमानतळ बंद केले नाही. हवाई वाहतूक सुरु ठेवून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढविला. देशात कोरोनाचे संकट कायम असतांनाही बिहार राज्यात विधानसभा निवडणूक घेण्यात आली. त्यानंतर देखील पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पौडेचेरी या राज्यात विधानसभा निवडणूक घेण्यात आल्या. त्यामुळे कोरोना पसरविण्याचे खरे पाप नरेंद्र मोदी यांचेच आहे. उत्तरप्रदेश विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन स्वतःचे पाप महाराष्ट्रावर लादण्याचा केविलवाणा प्रयत्न नरेंद्र मोदी यांचेकडून होत आहे.

महाराष्ट्रातील जनता हे कधीही खपवून घेणार नाही व सहनही करणार नाही. ही महाराष्ट्राची भूमिका नेहमीच दातृत्वाची राहिलेली आहे. नरेंद्र मोदी यांनी जनतेचा कुठलाही विचार न करता अविवेकी पणाने सरळ लॉकडाऊन लावून देशासमोर मोठे संकट उभे केले. परिणामी मजुरांना व त्यांचावर अवलंबून असलेल्या महिला, लहान मुले व वयोवृद्धांना हजारो किलोमीटर पायी चालत घरी जाण्याची वेळ नरेंद्र मोदी यांच्या अमानवी निर्णयामुळे ओढवली. यात हजारोंना प्राण गमवावे लागले. त्यामुळे वरील वक्तव्याचा नांदगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने मा.तहसिलदार सो यांना निवेदन दिले. ह्या वेळी
काँग्रेस तालुकाध्यक्ष समाधान पाटील,मा.नगराध्यक्ष चेतन पाटील,काँग्रेस नेत्या मुनावर सुलतान,सरोजभाभी शर्मा,उपाध्यक्ष अय्युब शेख,चिंधा बागुल,प्रशांत शर्मा,हसिना शेख,मंगला बुरकुले,अनिल पगारे उपस्थित होते

अजून बातम्या वाचा..

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त उत्कृष्ट चित्ररथांना भीमोत्सव तर्फे दिली जाणार रोख पारोषिक

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त उत्कृष्ट चित्ररथांना भीमोत्सव तर्फे दिली जाणार रोख पारोषिक

मनमाड - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भीमोत्सव आयोजन समितीच्या वतीने उत्कृष्ठ...

read more
नाशिक येथे होणाऱ्या शिवसेनेच्या निर्धार शिबिराच्या नियोजनासाठी गुरुवारी मनमाड येथे बैठक

नाशिक येथे होणाऱ्या शिवसेनेच्या निर्धार शिबिराच्या नियोजनासाठी गुरुवारी मनमाड येथे बैठक

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संघटनात्मक बांधणीकरीता नाशिक...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]