Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयाचे श्रमसंस्कार शिबिर शिंगवे येथे सुरू

Feb 12, 2022

तरूणांसाठी मूल्यशिक्षण, संस्कार आत्मसात करण्यासाठी श्रमसंस्कार महत्त्वाचे- डॉ रवींद्र राजपूत

महात्मा गांधी विद्यामंदिर संस्था संचलित, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड यांच्यावतीने राष्ट्रीय सेवा योजनचे श्रमसंस्कार शिबिर चांदवड तालुक्यातील शिंगवे मतोबाचे येथे सुरू झाले. या सात दिवसीय शिबिराचे उद्घाटन दिनांक ११ फेब्रुवारी २०२२ रोजी करण्यात आले. शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. व्ही. पाटील तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मनमाड येथील बालरोग तज्ञ डॉ. रवींद्र राजपूत उपस्थित होते. शिंगवे विकास सहकारी सोसायटीचे चेअरमन श्री. अनिल आहिरे ग्रामपंचायत सदस्य श्री संजय खताळ, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. पी. जी. आंबेकर, महाविद्यालयाचे शैक्षणिक पर्यवेक्षक डॉ. सतीश तांबे, महाविद्यालयाचे कुलसचिव श्री समाधान केदारे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या उद्घाटन प्रसंगी डॉ. रवींद्र राजपूत यांनी विद्यार्थ्यांना बहुमोल असे मार्गदर्शन केले. समाजामध्ये तरुण हा महत्त्वाचा दुवा समजला जातो. आजच्या तरूणाने महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांना शिक्षणाबरोबरच मूल्यशिक्षण, संस्कार हे आत्मसात करणे गरजेचे आहेत व त्याचबरोबर समाजाविषयी आदर भाव असणेही गरजेचे आहे. तसेच उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉ. ए. व्ही. पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना राष्ट्रीय सेवा योजनेची भूमिका आणि उद्देश सांगितला. त्याचबरोबर आजच्या तरुणांमध्ये राष्ट्रीय सेवा योजनामुळे एक चांगला तरुण घडतो. ग्रामीण भागातील रूढी-परंपरा आजच्या तरुणांना अवगत होण्यास मदत होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व शिबिराची उद्दिष्टे राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉ. पवनसिंग परदेशी यांनी केले, तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉ.गणेश गांगुर्डे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्राध्यापिका वर्षाराणी पेढेकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रासेयो स्वयंसेवक सोमनाथ अहिरे व रासेयो स्वयंसेविका अक्षदा पगारे यांनी केले. याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेतील सर्व स्वयंसेवक व स्वयंसेविका उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

शिक्षक आमदार, डॉ. अपूर्व हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनमाड महाविद्यालयातर्फे रक्तदान शिबिर व रुग्णांना फळ वाटप

शिक्षक आमदार, डॉ. अपूर्व हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनमाड महाविद्यालयातर्फे रक्तदान शिबिर व रुग्णांना फळ वाटप

महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित, कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय,मनमाड येथे महात्मा गांधी...

read more
जिल्हा नियोजनातून २० कोटींचा निधी : साल्हेर मुल्हेर सह होणार अंकाई किल्ल्याचे जतन

जिल्हा नियोजनातून २० कोटींचा निधी : साल्हेर मुल्हेर सह होणार अंकाई किल्ल्याचे जतन

नाशिक जिल्ह्यातील १३ स्मारकांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजनातून ३ टक्के निधी देण्यात येणार आहे....

read more
अधिक मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 04/08/2023 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अधिक मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 04/08/2023 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
मा.तात्यासाहेब साहेब तथा विश्वासराव देवरे कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा उत्कृष्ट निकाल

मा.तात्यासाहेब साहेब तथा विश्वासराव देवरे कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा उत्कृष्ट निकाल

उमराने:-सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मार्फत एप्रिल 2023 मध्ये घेण्यात आलेल्या कला, वाणिज्य व...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]