Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

तालुक्यातील तांड्यांवर विकास कामे सुरूच राहणार : सौ अंजुम कांदे

Feb 16, 2022

नांदगाव तालुक्यातील विविध बंजारा तांड्यांवर सेवालाल जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.बंजारा समाजाचे दैवत भगवान श्री सेवालाल महाराज जयंती निमित्त आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या पत्नी सौ अंजुम कांदे यांनी वसंत नगर तांडा, मुळडोंगरी तांडा, ढेकु तांडा,येथील कार्यक्रमांना भेट देवून बंजारा समाजाची पारंपरिक वेशभूषा धारण करीत बंजारा समाजातील महिलांसोबत पारंपरिक नृत्य देखील केले.बंजारा समाजाच्या समस्या सोडविण्यास आम्ही बांधील आहोत असा विश्वास याप्रसंगी त्यांनी बंजारा समाजाला दिला तसेच आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून सर्व तांड्यावर विकास कामे चालूच राहतील असेही त्यांनी याप्रसंगी सांगितले. विविध तांड्यावर भेट देऊन त्यांनी बंजारा समाजाच्या बंधू भगिनींना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख महिला आघाडी संगीता बागुल,उज्वला खाडे,भाऊराव बागुल,आण्णासाहेब मुंढे,एन. के.राठोड,अमोल नावंदर आणि बंजारा समाजातील बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे आयोजित संघटन पर्व 2024-25 अंतर्गत भाजपा सदस्य नोंदणी अभियानाला उस्फुर्त प्रतिसाद

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे आयोजित संघटन पर्व 2024-25 अंतर्गत भाजपा सदस्य नोंदणी अभियानाला उस्फुर्त प्रतिसाद

विश्वातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असणाऱ्या भाजपा च्या संघटन पर्व 24-25 अंतर्गत मनमाड शहर भाजपा...

read more
के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर. मुख्याध्यापक दीपक व्यवहारे. उपप्राचार्य...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]