आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या संपर्क कार्यालयात शिवसेनेच्या वतीने प्रतिमापूजन करून जयघोष करण्यात आला.
त्यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख संतोष बळीद, शहरप्रमुख मयुर बोरसे, जि. संघटक राजाभाऊ भाबड, युवासेना उपजिल्हाधिकारी मुन्नाभाऊ दरगुडे, युवासेना ता.समन्वयक योगेश इमले, उपतालुकाप्रमुख सुभाष माळवतकर, उपशहरप्रमुख प्रवीण (छोटू) धाकराव, सचिन दरगुडे, वैद्यकीय कक्ष विकास (पिंटू) वाघ, शहर संघटक महेंद्र गरुड, शाखाप्रमुख धिरज हिरे, नंदु पिठे ई. शिवसैनिक उपस्थित होते.
नांदगाव विधानसभा मतदार संघातील रणखेडा व बिरोळे येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत प्रत्येकी ५० लाख रुपये किंमतीच्या दोन पाणीपुरवठा योजनांचे भूमिपूजन आमदार सुहास कांदे यांचे पुतणे किरण कांदे यांचे हस्ते आज करण्यात आले.
रणखेडा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या रामवाडी व बिरोळे ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सतीचा माता...











