नांदगाव-येथील जे.टी.कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूल मधील छोट्या चिमुकल्यानी विद्यालयाच्या प्रागंणात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली. या प्रसंगी छोट्या बालगोपाळांनी शिवाजी महाराज व मासाहेब जिजाऊ यांची वेशभूषा केली होती. तसेच विद्यालयाच्या प्रागंणात ढोल ताशांच्या गजरात व ‘जय भवानी जय शिवाजी ,जय जिजाऊ’ अशा घोषणाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांचा उत्साह अवर्णनीय होता.
सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे चेअरमन मा.श्री.सुनिलकुमारजी कासलीवाल, सेक्रेटरी विजय चोपडा,संस्थेचे सर्व पदाधिकारी, प्राचार्य श्री. मणी चावला सर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ,पालक यांनी शिवजयंती निमित्ताने शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांनी सामाजीक मूल्ये जपावीत – डॉ श्री.संजय शांताराम सांगळे,सिद्धी क्लासेस गुणगौरव सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न
मनमाड - शंभर टक्के निकालाची परंपरा असलेला सिद्धी क्लासेस कॅम्पसचा गुणगौरव सोहळा 2024, 15 ऑगस्ट...











